स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वित्त व्यवस्थापनात तंत्रज्ञानाने आणली क्रांती

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 3, 2021
in इतर, लेख
ADVERTISEMENT

स्थैर्य, दि.३: आजच्या युगात तंत्रज्ञान हे अपरिहार्य बनले आहे. ऑटोमेशन व मोबाइल अॅप आधारीत सेवांच्या या दशकात बीएफएसआय क्षेत्र ग्राहकांसाठी तंत्रज्ञान-सक्षम सेवा एकिकृत करण्यात अग्रेसर आहे. परवडणारे स्मार्टफोन, टॅबलेट, कंप्यूटर व इतर इंटरनेटवरील उपकरणांनी वित्तीय व्यवस्थापन वापरणे सोपे करण्यासाठी नवा मार्ग आखला आहे. आज डिमॅट खाते उघडणे, फंड्स ट्रान्सफर करणे, फिक्स किंवा रिकरिंग डिपॉझिट सुरु करणे आणि लोन किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणे ही अगदी सोपी गोष्ट बनली आहे. यात भर म्हणजे, २०१६ मधील नोटाबंदीमुळे डिजिटल पेमेंट मोठ्या प्रमाणावर वाढले. त्यामुळे आर्थिक क्षेत्रात प्रचंड बदल झाला. तसेच मोबाइल अॅप्सनी वैयक्तिक वित्तीय सेवा दिल्या असल्याने, पैशांचे व्यवस्थापन करण्यासाठी अगदी प्रत्येकात पर्याय दिलेले आहेत. वित्त व्यवस्थापनाच्या पद्धतीत तंत्रज्ञानाने कशा प्रकारे क्रांती आणली आहे याबद्दल सांगताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे सीएमओ श्री प्रभाकर तिवारी.

क्रांती व तिचे परिणाम: वित्तीय क्षेत्रातील स्पर्धा ही केवळ बँक व त्यासंबंधी संस्थांपुरती मर्यादित नाही. फिनटेक कंपन्या आणि इतर क्षेत्रातही तिचे परिणाम दिसून येतात. बिझनेस मॉडेलप्रमाणेच, डिजिटल सॅव्ही ग्राहकांच्या मागण्यां पुरवण्याकरिता नोकऱ्यांचे स्वरुपही बदलले जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन व मशीन लर्निंगद्वारे चालणारे अॅप्लिकेशन्स ग्राहकांच्या सुरक्षेची हमी देतात. ओळख दाखवून केलेली चोरी व फसवणुकीविरोधात लढण्यासाठी यात वाढीव सुरक्षेच्या सुविधाही आहेत.

आपल्या बिझनेस मॉडेल व कार्यप्रणालीत बदल करण्यासाठी गुंतवणूक करण्यावर आधी बँका उत्सुक नव्हत्या. नव्या युगातील वित्तीय कंपन्यांनी अधिक तीक्ष्ण कार्यप्रणाली शोधून काढल्याने वेगाने वाढणाऱ्या टेक इंडस्ट्रीने त्यांना झोपेतून जागे केले. ते आता क्राऊड-फंडिंग प्लॅटफॉर्मद्वारे डिझाइन केलेल्या इतर ऑनलाइन मॉडेल्स, एनबीएफसीचे पीअर-टू-पीअर लेंडिंग मॉडेल, ब्रोकरेज फर्मचे बिट-कॉइन व अल्गो ट्रेडिंग इत्यादींशी स्पर्धा करत आहेत. एवढेच नाही तर ग्राहकदेखील वेगवान वित्तीय व्यवहार प्रणालीला सराईत होत आहेत.

स्वरुप बदललेल्या इतर वित्तीय सेवा: शेअर बाजाराच्या प्रकरणात, ग्राहक हे त्यांना जागतिक व देशांतर्गत इकोनॉमिक आउटलूक, गुंतवलेल्या प्रत्येक स्टॉकचे डिटेल्स, बाजाराची कामगिरी इत्यादींबद्दल सखोल माहिती घेण्यासाठी अॅपचे मॅनेजमेंट करण्यास सक्षम असतात. एक दशकभरापूर्वी स्टॉक एक्सचेंजच्या बाहेर रांगा लावणाऱ्या ट्रेडर्ससाठी आजचे ट्रेडर्स ज्या चपळाईने सर्व व्यवहार करतात, ते चित्र अकल्पनीय असेच होते. ज्यांनी इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) इकोसिस्टिम सर्वांसाठी उपलब्ध करण्याकरिता काम केले, त्या प्रतिभावान विचारवंतांना या क्रांतिकारी बदलाचे श्रेय द्यावे लागेल. एवढेच नाही तर ग्रामीण भागातील एसएमएमईंसह कॉर्पोरेट हाऊसमधील कर्मचाऱ्यांच्या खात्यातही एकदाच थेट पगार जमा केला जाऊ शकतो.

याचप्रमाणे, ई-कॉमर्स, इन्शुरन्स किंवा हेल्थकेअर इंडस्ट्रीमधील पेमेंटच्या पद्धती आणि व्यवहारांची प्रक्रिया एखाद्याच्या बँक खात्याशी बांधील आहे. त्यामुळे पूर्वीची प्रचंड गुंतागुंतीची प्रक्रिया बंद पडली असून स्मार्ट वित्तीय व्यवस्थापनाची साधने प्रत्येक यूझरपर्यंत पोहोचली आहेत, हे दिसून येते. आज इन्शुरन्स एजंट्स संभाव्य ग्राहकांना दुरूनच अधिकृत करू शकतात. यासाठी डिजिटल केवायसी प्रक्रिया वापरली जाते. रिटेलर्स ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर साइन अप करून त्यांची उत्पादने पेमेंट गेटवेच्या माध्यमातून विकू शकतात. अॅपवर आरोग्यविषयक सल्ला दिला जातो तर शुल्कही डिजिटली भरली जाते. प्रत्येक इंडस्ट्री मायक्रो-लेव्हल-फायनान्शिअल सिस्टिमशी डिजिटल पद्धतीने जोडली गेली आहे. यातून सत पैसा, व्यवहार, वैयक्तिक वित्तीय आरोग्य मूल्यांकनाची सतत सुनिश्चिती केली जाते.

वित्तीय व्यवस्थापनाचे भविष्य काय असेल?

आज भारतात अगदी दूर असलेल्या लोकांपर्यंत वित्तीय प्रणाली खुली झाली आहे, त्यामुळे यातून काही आव्हाने व संधीही निर्माण झाल्या आहेत. या दोन्ही बाबींसाठी तंत्रज्ञानाने कधीही जास्त महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली नाही. फसवणुकीचे व्यवहार शोधण्यात तंत्रज्ञान साधन म्हणून वापरले जाऊ शकते तसेच ज्यांना कर्ज देण्यास समर्थ ठरवले नाही, त्यांनाही पत-कर्ज देण्याचे व्यवस्थापन करण्यात आले.

पुढील काही वर्षांमध्ये टीअर ३ व ४ शहरांमध्ये लाखो ग्राहक तयार होतील. नव्याने कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना बँकिंग, ब्रोकरेज, लेंडिंग सेवा इत्यादींसाठी डिजिटल सहजता पुरवली जाईल. तसेच, इंडस्ट्री अंतर्गत सहकार्यातून देशाच्या कानाकोपऱ्यातून ब्लॉकचेन आणि एआय समर्थित व्यवहार होतील. हे व्यवहार अगदी सामान्य व व्यवस्थित सरावाचे होतील. एक क्रांतिनंतर इंडस्ट्री ४.० ने तिचा प्रवास पुन्हा सुरु केला आहे, यातून विशिष्ट संस्था, स्टार्ट-अप्स, वित्तीय प्रणाली आणि त्यातून निर्माण झालेले बदल हे कायमस्वरुपी राहतील.


ADVERTISEMENT
Previous Post

केळीची निर्यातवाढीसाठी नियोजनबध्द प्रयत्न करणार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची ग्वाही

Next Post

भाजपातर्फे राज्यभर होणार ‘शिवजागर’; भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची माहिती

Next Post

भाजपातर्फे राज्यभर होणार 'शिवजागर'; भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची माहिती

ताज्या बातम्या

प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे 37 हजार अर्ज रद्द

March 1, 2021

महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाने संपवली जीवनयात्रा

March 1, 2021

शांतिदुत परिवार व आयएमए असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

March 1, 2021

पूजा चव्हाणच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्र्यांना पत्र : ‘आमच्या मुलीची बदनामी केली जातेय, आम्ही संजय राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी केली नाही’

March 1, 2021

सीताराम कुंटेंनी स्वीकारला राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार, कोण आहेत सीताराम कुंटे?

March 1, 2021

अजित पवारही देवेंद्र फडणवीसांना भिडले, अधिवेशनाआधी दिलं खुलं आव्हान

March 1, 2021

चौथ्या कसोटीची खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमात

March 1, 2021

‘जंगजौहर’ बनला ‘पावनखिंड’, चित्रपटाची रिलीज डेटही आली समोर

February 28, 2021

चंद्रकांत पाटलांचा पवारांना सल्ला : ‘जे धाडस उद्धव ठाकरेंनी दाखवले, तेच शरद पवारांनी धनंजय मुंडेंच्या मुद्द्यावर दाखवायला हवे’

February 28, 2021

देवेंद्र फडवणीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांचा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा हल्ला

February 28, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.

×