कर्मवीर व रयत माऊली सौ.लक्ष्मीवहिनी यांचा वारसा शिक्षकांनी चालवावा – प्रा.डॉ.सुभाष वाघमारे


दैनिक स्थैर्य । दि. १० ऑक्टोबर २०२२ । सातारा । आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण
डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजनांच्या  शिक्षणासाठी  रयत शिक्षण संस्थेची स्थापना 4 ऑक्टोबर 1919 मध्ये  केली. अवघे चार   विद्यार्थी आणि तीस रुपये बजेट असणारी ही संस्था आज महाराष्ट्रातील 15 व कर्नाटक राज्यात्तील १ जिल्ह्यात विस्तारली असून रयतच्या ७७६ इतक्या   शाखा कार्यरत आहेत.  उपेक्षित वंचित समाजाच्या जीवनातील अज्ञान दूर करण्यासाठी शिक्षणाची गंगा सामान्यांच्या दारी नेऊन रयत शिक्षण संस्थेने तळमळीने कार्य कार्य केले आहे.नव्या जगात घडणाऱ्या शैक्षणिक हालचाली जाणून स्वतः आधुनिकच्या दिशेने ती जात आहे .तरीही मातीशी तिची नाळ कायम आहे. कर्मवीर अण्णा व रयत माऊली यांचा वारसा शिक्षकांनी अखंडपणे चालवावा असे आवाहन छत्रपती शिवाजी कॉलेजमधील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे केले. ते रयतशिक्षण संस्थेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी विभागाच्या अर्काईव्हज विभागाने छत्रपती शिवाजी कॉलेजयेथे पद्मभूषण डॉ. एक महान कर्मयोगी हे जीवन दर्शन प्रदर्शनात महात्मा फुले अध्यापक विद्यालयातील विद्यार्थी शिक्षकांशी बोलत होते. यावेळी प्राचार्य उदयकुमार सांगळे प्रा.प्रदीप हिवरकर,प्रा.रविंद्र घाटगे .प्रा.सोमनाथ शिंगाडे ,सौ.शिंदे ,इत्यादी शिक्षक उपस्थित होते. यावेळी महात्मा फुले अध्यापक विद्यालयाच्या विद्यार्थी शिक्षकांनी या  कर्मवीर जीवन प्रदर्शनाला भेट दिली. रयत शिक्षण संस्थेच्या इतिहास, रयत शिक्षण संस्थेची संस्कृती,
संस्थेची वाटचाल,  कर्मवीर भाऊराव पाटील यांना मदत केलेले त्यांचे सहकारी, देणगीदार रयत माऊलींचा त्याग,आप्पासाहेब पाटील,  तात्यासाहेब तडसरकर, संत गाडगे महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट चारभिंतीवरील डोंगर फोडताना विद्यार्थी समवेत कर्मवीर  अण्णा असे अनेक दुर्मिळ फोटो , कर्मवीरांचा जीवनपट व कर्मवीरांच्या नंतर रयत शिक्षण संस्थेने केलेले आधुनिक शैक्षणिक प्रयोग याची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना सविस्तर मिळाली. प्रदर्शन स्थळी  समिधा, माजी संघर्षगाथा, कर्मवीरोपनिषद, सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचे चरित्र इत्यादी ग्रंथांविषयी  आवर्जून माहिती घेतली.  तसेच’ रयत काल आज आणि उद्या’ त्याचबरोबर’ गाथा  कर्मवीरांची’ हा लघुपट सुद्धा विद्यार्थ्यांना पहायला मिळाला. याप्रसंगी चारभिंती परिसरात विद्यार्थी डोंगर फोडत आहे आणि कर्मवीर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे.  ही रांगोळी पाहून उपस्थित विद्यार्थ्यांना श्रमप्रतिष्ठेची शिकवण मिळाली.रयत विज्ञान परिषद ,रयत शिक्षण संस्थेचे, कृषी ,विज्ञान ,क्रीडा विषयक कार्य, रयत शिक्षण संस्थेचे परस्पर सामंजस्य करार यांचे मोडेल रूपाने माहिती मिळाली. कर्मवीर भाऊराव पाटील यांची काठी ,पेन ,खुर्ची,बिछाना.खादीचा शर्ट ,कपबशी ,वाटगा इत्यादी वस्तू जवळून पहायला मिळाल्याने

विद्यार्थ्यांना धन्यता वाटली.आणि कर्मवीरांची साधी राहणी याचे प्रत्यक्ष दर्शन त्यांना घडले.  छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये प्रवेश करताच उपप्राचार्य प्रा.डॉ. अनिलकुमार वावरे व ग्रंथपाल एकनाथ झावरे इत्यादींनी सर्व अध्यापक विद्यालयाचे प्रशिक्षणार्थी यांचे स्वागत
केले. याप्रसंगी सर्व दुर्मिळ चित्रे व माहिती ऐकून सर्व प्रशिक्षणार्थी भावूक झाले. गाईड म्हणून प्रदर्शनात सविस्तर माहिती दिल्याबद्दल विद्यार्थ्यानी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानले .


Back to top button
Don`t copy text!