छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यावर कारवाई करा – म्हसवडकर शिवप्रेमी


 

स्थैर्य, म्हसवड दि. ११ : बेळगांव जिल्ह्यातील माणगुती गावामध्ये छ.शिवाजी महारांच्या अश्वरुपी पुतळ्याची काही समाज कंटकांकडुन विटंबना करण्यात आली असुन त्या समाज कंटकांचा पोलीसांनी शोध घेवुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन म्हसवड येथील छ. शिवाजी महाराज प्रेमींनी पोलीसांना देत या घटनेचा कडाडुन निषेध केला आहे.

छ. शिवाजी राजे हे दिन दलितांचे राजे तर प्रत्येक मराठी माणसाचे दैवत आहे अशा या दैवताच्या पुतळ्याची विटंबना करणारे नक्कीच पाक विचारसरणीचे लोकं असणार आहेत अशा समाजकंटकांचा पोलीसांनी तात्काळ शोध घेवुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सदर निवेदनाद्वारे शिवप्रेमींनी केली आहे. सदर निवेदनावर येथील आकाश माने, हर्षद माने, सुधीर माने, अँड. रोहण माने, महादेव माने राहुल मंगरुळे आदींच्या सह्या आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!