शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर कारवाई करा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि. 17 : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या हल्लेखोर ठेकेदार गणेश पवार याच्यावर कारवाई करण्यात यावी, ज्या कार्यालयात हा हल्ला झाला तेथील मुख्याधिकारी यांनी गुन्हा दाखल करायला हवा होता. परंतु त्यांनी जबाबदारी झटकली म्हणून या सर्व घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांच्या भेट घेतली.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख दत्ता नलावडे, उपतालुका प्रमुख रमेश बोराटे, धर्मवीर युवा मंच अध्यक्ष प्रशांत नलवडे, सातारा शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, कोरेगाव शहर प्रमुख अक्षय बर्गे, उप तालुका प्रमुख जोतीराम गवळी,उप तालुका प्रमुख ऋषीकेश गवळी, सोशल मीडिया तालुका प्रमुख संदीप जाधव वाहतूक सेना तालुकाप्रमुख सचिन जगताप, विभागप्रमुख मनोज नलावडे, कपील शिंदेव इतर शिवसैनिक उपस्थित होते.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!