शहीद जवान उद्धव घनवट यांच्या कन्येचे इ.10 वी परिक्षेत सुयश

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण : उपवळे ता.फलटण गावचे सुपुत्र ’हुतात्मा उद्धव किसन घनवट’ यांची कन्या ’कु.स्नेहल उद्धव घनवट’ इयत्ता 10 वी.(सी.बी.एस.सी.) मध्ये 94.2% गुण मिळवून उत्तीर्ण झाली.

हुतात्मा उद्धव किसन घनवट हे 14 मे 2008 रोजी कर्तव्य बजावत असताना दहशतवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आले आणि ते देशसेवा करत असताना हुतात्मा झाले . तर 5 नोव्हेंबर 2018 रोजी स्नेहलच्या आईचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांना मरण आले. अशी दुर्दैवी, दुःखद प्रतिकुल वेळ कु.स्नेहलवर असताना देखील तिने शिक्षणात असणारी गुणवत्ता टिकवत आता इयत्ता 10वी. मध्ये 94.2% गुण मिळवले आहेत.

कु.स्नेहल श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कुल या विद्यालयाची विद्यार्थीनी आहे.

स्नेहलच्या या यशाबद्दल तिचे अभिनंदन करुन पुढील शिक्षणासाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन जयहिंद फौंडेशनच्यावतीने देण्यात आले आहे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!