जाधववाडीच्या विकासासाठी ‘निष्ठावंत राजेगट पॅनेल’ ला साथ द्या; दिपक सपकाळ, समृद्धी भोंग व सोनाली पवार यांचे मतदारांना आवाहन


स्थैर्य, जाधववाडी दि. १३ : फलटण शहरानजिक असलेल्या जाधववाडी गावाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत गावात मुलभूत सुविधांचा अभाव पडू न देण्यासाठी आणि गावाच्या अखंड विकासासाठी ‘निष्ठावंत राजेगट पॅनेल’ ला मतदारांनी साथ द्यावी, असे आवाहन जाधववाडी ग्रामपंचायत निवडणूकीतील पंचमुखी हनुमान मंदीर वॉर्ड (वॉर्ड क्र.2) मधील ‘निष्ठावंत राजेगट पॅनेल’चे अधिकृत मुदेवार दिपक सपकाळ, समृद्धी भोंग व सोनाली पवार यांनी मतदारांना केले आहे. आम्हाला संधी दिल्यास आपल्या वॉर्डात मुलभूत सुविधांची कमतरता कधीही भासू देणार नसल्याचेही ते मतदारांना आवर्जून सांगत आहेत.

दरम्यान, या निवडणूकीत वॉर्ड क्रमांक २ मधील उमेदवार दिपक सपकाळ यांनी घेतलेला ग्रामविकासाचा ध्यास अभिमानास्पद असल्याचे वॉर्डातील लोक सांगत आहेत. काही दिवसांपूर्वीच दिपक सपकाळ यांची बायपास सर्जरी झालेली आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला असताना देखील गावाच्या विकासासाठी ते या निवडणूकीत उतरले आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उद्भवलेल्या लॉकडॉऊनच्या संकटात देखील त्यांनी जाधववाडी परिसरात अनेक गरजू कुटूंबांना मदतीचा हात दिला होता. ते गावातील सामाजिक उपक्रमात नेहमीच आघाडीवर राहणारे असे व्यक्तीमत्त्व असल्याने, आपल्या प्रकृतीची काळजी न करता ते निवडणूकीत उतरले असून त्यांच्या या ग्रामविकासाच्या ध्यासाचे अनेकांकडून कौतुक होत आहे. त्यांच्यासोबत वॉर्ड मधून निवडणूक लढवीत असलेल्या सौ. समृद्धी भोंग व सौ. सोनाली पवार यांनी आपले शिक्षण व उच्च शिक्षण नामांकित शिक्षण संस्थेतून घेतले असून त्याचा फायदा नक्कीच आगामी काळामध्ये वॉर्डच्या विकासासाठी होईल यात तिळमात्र शंका नाही.

जाधववाडी ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचारार्थ वार्ड क्रमांक २ मधील जनतेशी ‘हाऊस टू हाऊस’ प्रचारादरम्यान दिपक सपकाळ, समृद्धी भोंग व सोनाली पवार हे मतदारांशी संवाद साधत असून त्यांना मतदार वर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

मतदारांशी संवादा दरम्यान वॉर्डातील अक्षत रेसिडेन्सीमधील संपूर्ण ड्रेनेज तसेच बाथरुम किचन पाणी दुभाजन करुन योग्य व्यवस्थापन करणे, वॉर्डमधील ओपन स्पेस डेव्हलपमेंट करणे. त्यामध्ये लहान मुलांना गार्डन व वयोवृद्धांना वॉकींग ट्रॅक बनविणे. वॉर्डमधील सर्व भागातील रस्त्यावरती लाईटचे खांब व त्यावर एलईडी लाईटस् बसविणे. वॉर्डमधील सर्व भागात व चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे. नाळेमळा व शिक्षक वसाहतमधील अपुरे डांबरीकरण पूर्ण करणे. पंचमुखी हनुमान मंदीर ते डोईफोडे, नाळे घर डांबरीकरण करणे. आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा साईडपट्टी तयार करणे. रुंदीकरण करणे तसेच वृक्ष लागवड व संगोपन करणे. पेव्हींग ब्लॉक बसवणे. आवश्यक त्या ठिकाणी बंदीस्त गटारे करणे. नियमित पिण्याच्या पाण्याची सोय करणे. लहान मुलांसाठी अंगणवाडी, बालवाडी शाळा उभारणे. लोकांच्या सोयीसाठी सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानाची उपलब्धता करुन देणे. वॉर्डातील गरजूंना घरकुल आवास योजनेचा लाभ मिळवून देणे आदी विकासात्मक कामांचा अजेंडा घेवून आम्ही निवडणूकीत उतरलो असल्याचे प्रचारादरम्यान दिपक सपकाळ, समृद्धी भोंग व सोनाली पवार हे मतदारांना आवर्जून सांगत असून या सर्व विकासकामांच्या पूर्ततेसाठी संधी देण्याचे आवाहनही दिपक सपकाळ, समृद्धी भोंग व सोनाली पवार मतदारांना करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!