फलटण येथील श्रीराम व श्रीदत्त मंदिराचा २२ जानेवारीला शिखर जीर्णोध्दार शुभारंभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २१ जानेवारी २०२४ | फलटण |
अयोध्या श्रीराम जन्मभूमी मंदिरातील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सोमवार, दि. २२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२.२० वाजता श्रीराम मंदिर फलटण येथे श्रीराम व श्रीदत्त मंदिर शिखर जीर्णोध्दार शुभारंभ संपन्न होत आहे. हा सोहळा फलटण संस्थानचे अधिपती, विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे.

या दिवशी धार्मिक विधी व कार्यक्रम असे :

  • पहाटे ५.३० ते ७.३० : प्रभू श्रीराम व श्रीदत्त प्रभू लघुरूद्र पुरूष सूत, अभिषेक, पूजन.
  • स. ७.४५ ते ८.३० : पुण्याहवाचन विधी, शिखर जीर्णोध्दार कार्यक्रम संकल्प विधी.
  • स. ९.०० ते १०.०० : मुख्य देवता स्थापना, धर्म ध्वज पूजा व शिखर पूजा
  • स. ११.०० ते दु. १२.०० : होम हवन विधी व पूर्णाहुती
  • दु. १२.२० ते दु. १२.३० : श्रीराम व श्रीदत्त मंदिर शिखराचा जीर्णोध्दार सोहळा
  • दु. १२.३० ते दु. १२.५० : महाआरती
  • दु. १.०० ते सायं. ४.०० : महाप्रसाद
  • सायं. ४.३० ते ५.०० : श्री गणपती अथर्वशीर्ष, श्री रामरक्षा स्तोत्र, श्री मारूती स्तोत्र पठण (रामकृष्ण पाठशाळा, फलटण)
  • सायं. ५.०० ते रात्री ८.०० : प्रभू श्रीरामचंद्र यांच्यावर आधारीत हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम (सादरकर्ते – कला प्रसारक संस्था, पुणे)

या सर्व कार्यक्रमांचा मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज् ट्रस्ट, फलटण यांच्याकडून करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!