नोंदी सापडलेल्या नागरिकांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत : प्रांताधिकारी सचिन ढोले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 21 जानेवारी 2024 | फलटण | फलटण तालुक्यातील विविध गावांमध्ये कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. त्या नोंदी गाव निहाय गावांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. संबंधित गावातील नागरिकांनी त्या बघून त्याप्रमाणे आपली वंशावळ तयार करावी व कुणबी प्रमाणपत्रासाठी विहित नमुन्यात अर्ज करावेत; असे आवाहन फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.

फलटण तालुक्यातील तरडफ, तडवळे, ढवळ, टाकळवाडा, गिरवी, कुरवली बु.||, काळज, आसू, आळजापुर, हिंगणगाव, सोमांथळी, सुरवडी, खुंटे, होळ, सांगवी, विडणी, भाडळी बु.||, खामगाव, विंचुर्णी, भाडळी खु.||, राजुरी, बिबी, साठे, मिरगाव, पिंपरद, निरगुडी, निंभोरे, निंबळक या गावांमध्ये कुणबी नोंदी सापडल्या असल्याचे प्रांताधिकारी ढोले यांनी स्पष्ट केले आहे.


Back to top button
Don`t copy text!