फलटण: दैनिक ऐक्यचे पत्रकार मुगुटराव कदम यांचे निधन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक ऐक्यचे ज्येष्ठ पत्रकार मुगुटराव कदम यांचे निधन झाले असून दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यविधी होणार आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०१ ऑगस्ट : मालोजीनगर, कोळकी (ता. फलटण) येथील रहिवासी आणि ‘दैनिक ऐक्य’चे पत्रकार मुगुटराव ज्ञानदेव कदम यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने फलटण परिसरातील पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

दुपारी अंत्यविधी

पत्रकार मुगुटराव कदम यांच्या पार्थिवावर दुपारी १:०० वाजता फलटण येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

Back to top button
Don`t copy text!