
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २१ जानेवारी २०२४ | फलटण |
वार्षिक उत्सव समिती, फलटण आगाराकडून उद्या, सोमवार, दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन आगारातील श्रीदत्त मंदिर येथे करण्यात आले आहे.
यावेळी श्रीदत्त मंदिरात श्रीराम प्रभूंची आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. याप्रसंगी आगारातील सर्व कर्मचारी बंधू-भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वार्षिक उत्सव समिती, फलटण आगारातर्फे करण्यात आले आहे.
