दैनिक स्थैर्य | दि. १३ एप्रिल २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी, क्रीडा समिती आयोजित उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर २०२३ दि. १३ ते २५ एप्रिलदरम्यान संपन्न होत आहे.
या प्रशिक्षणाचा वेळ सकाळी ६.०० ते ८.०० असा असणार आहे. या प्रशिक्षण शिबिराची फी २५०/- रुपये राहील.
या प्रशिक्षण शिबिरांची ठिकाणे अशी : एसएसईएमएस (सीबीएसई) – आर्चरी (धनुर्विद्या), श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल – हॉकी, फूटबॉल, खो-खो, मुधोजी महाविद्यालय – मैदानी खेळ (कबड्डी, कुस्ती, व्हॉलीबॉल), मुधोजी क्लब – बास्केटबॉल.
या प्रशिक्षण शिबिरात भाग घेणार्या सर्व खेळाडूंना दररोज पौष्टिक नाष्टा दिला जाईल. तसेच सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येईल.
संपर्कप्रमुख : सचिन धुमाळ – ९८९०३८२२०४, तुषार मोहिते – ९४२३८८८३४४, स्वप्निल पाटील – ९४२१२१००७९, तायाप्पा शेंडगे – ९३२२७४८१९९, सुरज ढेंबरे – ८८०५७७७९९८.