दैनिक स्थैर्य | दि. १३ एप्रिल २०२३ | फलटण |
साखरवाडी (ता. फलटण) गावच्या हद्दीत दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास मुरूम ते साखरवाडी रस्त्यावर खड्ड्यातून मोटारसायकल जात असताना गाडीवरील ताबा सुटल्याने दत्तात्रय आबासोा बनकर (वय ४०, रा. वाखरी, ता. फलटण, जिल्हा सातारा) दुचाकीचालक रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची खबर सावता तायाराम बनकर (रा. वाखरी) यांनी फलटण ग्रामीण पोलिसात दिली आहे.
या अपघाताची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, साखरवाडी (ता. फलटण) गावच्या हद्दीत दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास मुरूम ते साखरवाडी रस्त्यावर दत्तात्रय आबासोा बनकर (वय ४०, रा. वाखरी, ता. फलटण, जिल्हा सातारा) हे मोटारसायकलवरून (क्र. एमएच ११ डीओ ३९०२) जात असताना त्यांच्या ताब्यातील दुचाकी खड्ड्यात गेल्याने त्यांचा गाडीवरील ताबा सुटून अपघात घडला. या अपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर जखम झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताचा अधिक तपास सपोनि शिंदे करत आहेत.