
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि. 23 : शाहूपुरी, सातारा येथील एका युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सौरभ जगन्नाथ गायकवाड (वय २१) रा. शाहूपुरी, सातारा याने सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घराच्या शेडला नायलॉन दोरीने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला तात्काळ येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
