
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, औंध, दि.२: औंध-घाटमाथा रोडवर नांदोशी पुलानजीक औंधवरून घाटमाथ्याकडे जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरने औंधकडे येणाऱ्या टेम्पोला धडक दिली. त्यामध्ये टेम्पोचालक जखमी झाला असून टेम्पोचेही नुकसान झाले आहे.
औंधवरून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर (क्र. एम. एच. 23 एच. 8631) हा घाटमाथ्याकडे चालला होता, तर कऱ्हाडहून औंधमार्गे सिद्धेश्वर कुरोलीला माल घेऊन टेम्पो (क्र. एम. एच. 11 एम. 4582) निघाला होता. नांदोशी पुलानजीक आल्यानंतर भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टरने सरळ टेम्पोला धडक दिली. त्याचवेळी उसाने भरलेल्या दोन्ही ट्रॉली पलटी झाल्या.
