साता-याच्या भाजप युवा मोर्चात संघटनात्मक बदल करणार : विक्रांत पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, सातारा, दि.२ : पश्‍चिम महाराष्ट्रात भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून पदवीधरसाठी 55 हजार मतदार नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र उभे करून केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोचवत तरुण पिढीचे रोजगार व इतर प्रश्‍न सोडविणार असल्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी येथे सांगितले.

युवा मोर्चाच्या वतीने महाअभियान पदवीधर नोंदणी व मार्गदर्शन बैठक येथे आयोजिली होती. या प्रसंगी पाटील बोलत होते. प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जगन्नाथ पाटील, अनुप मोरे, नीलेश नलावडे व इतर उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, “”भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून राज्यभरात विकासात्मक कामे सुरू आहेत. राज्यभरात कार्यकर्त्यांशी चर्चा करून व मोर्चाच्या माध्यमातून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी तळागाळात काम करणाऱ्या व सक्षम नेतृत्व करणाऱ्यांना संधी दिली जाणार आहे, तसेच पदवीधर मतदार नोंदणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान पाच हजार नोंदणी केली जाणार आहे.” सातारा शहर व जिल्ह्यात भारतीय जनता युवा मोर्चाची ताकद वाढविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात काही प्रमाणात संघटनात्मक बदल करण्यात येणार आहे, तसेच मोर्चाच्या माध्यमातून तरुणांना संधी देऊन विकासात्मक कामे केली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

विकासात्मक कामात राज्य मागे 

देशभरात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे. मात्र, कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरले आहे, तसेच विकासात्मक कामातही राज्य मागे तर कोरोनाच्या आकडेवारीत पुढे असल्याची स्थिती आहे. राज्यभरात जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडणे आवश्‍यक असून, वातानुकूलित यंत्रणेत बसून राज्याचा विकास होत नाही, अशी टीका श्री. पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!