वित्तीय आणि मेटल स्टॉक्सची दमदार कामगिरी


 

स्थैर्य, मुंबई, ११ : भारतीय निर्देशांकांनी आजच्या व्यापारी सत्रात वित्तीय आणि मेटल स्टॉक्सच्या दमदार कामगिरीच्या जोरावर वाढ नोंदवली. निफ्टी ०.४६% किंवा ५२.३५ अंकांनी वाढला व ११,३२२.५० अंकांवर बंद झाला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.५९% किंवा २२४.९३ अंकांनी वाढला व ३८,४०७.०१ अंकांवर स्थिरावला.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात जवळपास १५५९ शेअर्सना नफा झाला, ११४६ शेअर्स घसरले तर १४३ शेअर्स स्थिर राहिले. झी एंटरटेनमेंट (५.१६%), अॅक्सिस बँक (३.९२%), जेएसडब्ल्यू स्टील (३.९४%), बीपीसीएल (३.५%) आणि इंडसइंड बँक (२.५०%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर श्री सिमेंट्स (३.८७%), टायटन कंपनी (३.५७%), युपीएल (२.३३%), डॉ. रेड्डीज (१.९६%) आणि सिपला (२.०९%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. आयटी आणि फार्मा व्यतिरिक्त सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी हिरव्या रंगात व्यापार केला. बीएसई मिडकॅप ०.२० टक्क्यांनी तर बीएसई स्मॉलकॅप ०.२३ टक्क्यांनी घसरला.

बँक ऑफ बडोदा लिमिटेड : बँकेने जून तिमाहितील उत्पन्न घोषित केले. यात २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहित निव्वळ तोटा ८६४.३ कोटी रुपये झाल्याचे नोंदवले. यानंतर कंपनीचे स्टॉक २.७८% नी घसरले व त्यांनी ४७.२० रुपयांवर व्यापार केला.

बॉश लिमिटेड : कंपनीने २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीने एकत्रित निव्वळ तोटा १२१.५ कोटी रुपये झाल्याचे नोंदवले. कंपनीचा महसूलदेखील ६४% नी घटला. परिणामी कंपनीचे स्टॉक्स २.४८% नी घसरले व त्यांनी १३,२५५ रुपयांवर व्यापार केला.

जेएसडब्ल्यू स्टील : कंपनीचे कच्चे स्टील प्रॉडक्शन वार्षिक स्तरावर ५% नी घसरले. तथापि, कंपनीचे स्टॉक्स ३.९४% नी वाढले व त्यांनी २५४.८५ रुपयांवर व्यापार केला.

टायटन कंपनी : कंपनीचा २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहितील निव्वळ तोटा २७० कोटी रुपये झाला. तर या काळातील महसूल ६२.३% नी घसरला. परिणामी कंपनीचे स्टॉक्स ३.५७% नी घसरले व त्यांनी १,०६८.०० रुपयांवर व्यापार केला.

भारतीय रुपया : देशांतर्गत इक्विटी मार्केटमध्ये खरेदी दिसून आल्याने भारतीय रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आज ७४.७७ रुपयांचे मूल्य अनुभवले.

जागतिक बाजार : प्रादेशिक आर्थिक कामकाजात सुधारणा आणि टेक्नोलॉजी शेअर्सच्या मागणीत वाढ झाल्याने आशियाई बाजारात सकारात्मक हालचाली दिसून आल्या. युरोपियन मार्केदेखील उच्चांकी स्थितीत बंद झाले. एफटीएसई १०० चे शेअर्स २.३९% नी वाढले तर एफटीएसई एमआयबीचे शेअर्स २.८८% नी वाढले. निक्केई २२५ चे शेअर्स १.८८% वाढले तर हँगसेंग कंपनीचे शेअर्स २.११% नी वाढले. तर नॅसडॅकचे शेअर्स ०.३९% नी घटले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!