राज्य सहकारी बँकेच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५ कोटी रुपयांची मदत


 

स्थैर्य, मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला असून आज तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, राज्यमंत्री विश्वजित कदम, माजी खासदार आनंदराव अडसूळ, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर आणि सरव्यवस्थापक दिलीप दिघे आदी मान्यवर उपस्थित होते.  मुख्यमंत्री ठाकरे यांनी बँक व्यवस्थापनाला या मदतीसाठी धन्यवाद दिले आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!