प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा जी यांच्याशी सदिच्छा भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ ऑगस्ट २०२२ । मुंबई । भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. जगत प्रकाश नड्डा जी, भाजपा राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष जी यांच्यासह मान्यवर नेत्यांची सदिच्छा भेट घेतली.

मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मा. अमित शाह यांनी मा. बावनकुळे यांना पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि अन्य महत्त्वाच्या विषयांबद्दल मार्गदर्शन केले.

मा. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. जगत प्रकाश नड्डा जी यांची सदिच्छा भेट घेतली. मा. नड्डा जी यांनी मा. बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर झालेल्या या पहिल्या भेटीमध्ये राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींविषयी चर्चा झाली व मा. नड्डा जी यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

मा. बावनकुळे यांनी नवी दिल्ली येथे भाजपा राष्ट्रीय संघटनमंत्री मा. बी. एल. संतोष जी, केंद्रीय व्यापारमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय कामगारमंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री मा. रावसाहेब पाटील दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची सदिच्छा भेट घेतली.  


Back to top button
Don`t copy text!