फलटण: धोम-बलकवडीचे पाणी दुष्काळी भागात – शेतकऱ्यांना दिलासा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

धोम-बलकवडी धरणातील अतिरिक्त पाणी फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २८ जुलै : धोम-बलकवडी धरणात जमा झालेला अतिरिक्त पाणीसाठा आता फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी सोडण्यात येणार आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निर्देशानुसार आणि आमदार सचिन पाटील यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

दुष्काळी भागाला मोठा दिलासा

धरणातील पाणी तालुक्यातील टंचाईग्रस्त आणि दुष्काळी पट्ट्यात पोहोचल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

पाण्याचे नियोजन

धोम-बलकवडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. हे अतिरिक्त पाणी योग्य नियोजनाद्वारे फलटणच्या दुष्काळी भागातील कालवे आणि ओढ्यांमध्ये सोडण्यात येत आहे. यामुळे भूजल पातळी वाढण्यासही मदत होणार आहे.

Back to top button
Don`t copy text!