स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नव्या वर्षात तुमच्या अर्थविश्वाची नव्याने सुरुवात करा

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 9, 2021
in इतर
अमेरिकेकडून अतिरिक्त मदतीमुळे सोने व क्रूडच्या दरांना आधार मिळण्याची शक्यता
ADVERTISEMENT

स्थैर्य, दि९: २०२० हे वर्ष अनेक लोकांसाठी प्रचंड चढ-उतारांचे वर्ष होते. मात्र, व्यवसायांसाठी हा पूर्वी कधीही आला नाही, असा वाईट अनुभव होता. उत्पादनाची मागणी आणि पुरवठ्यात असंख्य वळणे आली. लॉकडाऊनचे वाढलेले आठवडे, महिने, यामुळे २०२० मध्ये व्यवसाय टिकवून ठेवण्याचे खरोखर आव्हान होते. परिणामी गुंतवणुकीसाठीही हा काळ कठीण होता.

अर्थात पहिला अनुभव नेहमीच कठीण असतो. २०२० संपलेय, त्यामुळे जे काही घडले, ते मागे टाकण्याची आणि काहीतरी नवे करण्याची वेळ आली आहे. बाजार विस्कटलेली घडी नव्याने बसवत असताना तुमच्या अर्थविश्वाची नवी सुरुवात करण्याच्या पाच मार्गांबद्दल सांगताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे इक्विटी स्टॅटजिस्ट-डीव्हीपी श्री. ज्योती रॉय.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

१. जोखीम पेलण्याच्या क्षमतेचा पुनर्विचार करा: २०२० हे वर्ष अनेकांसाठी धक्कादायक ठरले. त्यांच्या पोर्टफोलिओत प्रचंड जोखीम असल्याने ते उद्विग्न, अस्वस्थ झाले. एवढेच नाही तर त्यांनी मौल्यवान धातू आणि रिअल इस्टेटसारख्या पर्यायी गुंतवणूकीचा मार्ग निवडला. अर्थात जोखीमीच्या पैलूला संपूर्ण दोष देता येत नाही. कारण महामारीमुळे सर्वच क्षेत्रात धुळधाण उडाली. अर्थात, विविधता हा समस्येचा एक भाग होता आणि जोखीम व्यवस्थापन धोरण हा दुसरा भाग.

आता नव्या वर्षाला सामोरे जाताना, नवी गुंतवणूक आणि सुधारीत पोर्टफोलिओ यांद्वारे जोखीमीची नव्याने व्याख्या करता आली. नव्याने उभारी घेणाऱ्या बाजारात कोण-कोणत्या प्रकारची जोखीम असू शकते आणि तुमची स्वत:ची आर्थिक स्थिरता एकंदरीत साथीच्या काळात कशा प्रकारे विकसित झाले आहे, या सर्वांचा विचार केला पाहिजे.

मागील वर्षात तुमची जोखीम पेलण्याची सहनशक्ती कमी झाली आहे का? कमोडिटीज ट्रेडिंगमध्ये तुम्ही तुमच्या बचतीपैकी ८० टक्के भाग गुंतवू शकता का किंवा तुम्ही कमी जोखीम असलेले पर्याय शोधायला हवेत का, उदा. हायब्रिड म्युच्युअल फंड्स? त्यामुळे पुढे जाण्यासाठी थोडा वेळ आपली धोका पत्करण्याची क्षमता किती आहे, यावर अवश्य विचार करा.

२. आत्मविश्वासाचा आणखी एक धडा: साथीच्या प्रसाराची बातमी गुंतवणुकदारांपर्यंत पोहोचू लागली, तशी पॅनिक स्थिती होऊन विक्री सुरु झाली. सिक्युरिटीजमध्ये लोअर सर्किटची स्थिती उद्भवली. हाय ग्रोथ असलेल्या फंड्समध्ये ज्यांनी आपल्या बचतीचा मोठा वाटा गुंतवला होता, अशा दीर्घकालीन गुंतवणूकदारांमध्ये असंतोष वाढू लागला. बाजार कशा प्रकारे कोसळला यापेक्षा साथीनंतरचे परिणाम येथे लक्षात घेण्यासारखे आहेत. ही घसरण सुरूच राहिली का? अर्थातच नाही. विशेष म्हणजे, सुधारणा अधिक जोमाने झाली. कोव्हिडच्या काळातही बाजार कसा वृद्धींगत होतोय, यावर सार्वजनिक रित्या फोरम्समध्ये तज्ञांना प्रश्न विचारण्यात आले. एफएमसीजी आणि तंत्रज्ञानासारख्या काही क्षेत्रांत विक्रमी वाढ झाली आणि तंत्रज्ञानासंहंधी म्युच्युअल फंडांनीही वार्षित परताव्याचा दर ६२+% एवढा दर्शवला. त्यामुळे आत्मविश्वासाचा धडा पुन्हा घेण्याची ही वेळ आहे. शेअर बाजार अल्पावधीत कोसळू शकतो, पण काही काळात अधिक वृद्धीने ही घसरण संतुलित होते. त्यामुळे यातून शिकवण घ्या व पुढील वर्षात गुंतवणूक काढून घेण्याची इच्छा होईल, तेव्हा या प्रसंगाचे स्मरण अवश्य करा.

३. बाजार रीबूट होताना कीवर्ड शोधा: बाजार रीबूट होतोय, हे ऐकल्यावर तुम्हाला काय वाटते. रिबूट हा इथे स्पष्टपणे कीवर्ड आहे. लॉकडाऊननंतर, कंपन्यांनी त्यांचा व्यवसाय रिस्टार्ट करण्यावर भर दिला. बातम्यांमध्ये ज्या बद्दल बोलले जाते, त्या प्रकारचे हे रिबूटिंग नाही. खरं तर रीबूटची प्रक्रिया निरंतर सुरू राहील. साथीचे बाजारावर दीर्घकालीन परिणाम जाणवतील. २०२१ मध्ये गुंतवणूक करताना, दीर्घकालीन शक्यतांचे मूल्यांकन करताना हा महत्त्वपूर्ण घटक मानला पाहिजे.

काही उदाहरणांसह याचा विचार करा. निर्मिती क्षेत्रात, ज्या कंपन्या आपले कामकाज सुधारण्यासाठी ऑटोमेशन आणि नव्या उद्योग तंत्रज्ञानावर गुंतवणुक करत नाहीत, त्यांच्यावर साथीनंतर तुलनात्मकरित्या गंभीर तोटा झाला. किंबहुना, अशा कंपन्यातून गुंतवणूक काढून घेणे कधीही सोयीस्कर. दीर्घकालीन वृद्धीचे योजन असलेल्या कंपनीत गुंतवणूक करावी. प्रमुख गुंतवणुकींसाठी तंत्रत्रान हा सर्वात मोठा लाभदायी घटक ठरेल. कारण साथीच्या नंतरच्या युगात बहुतांश व्यवसायिक नव्या तंत्रज्ञानावर गुंतवणूक करत आहेत. बाजार रीबूट होण्याची गती वेगवेगळी असेल- पुढील वर्षात एखाद्या दीर्घकालीन गुंतवणुकीत अडकण्यापूर्वी नवीन ट्रेंडकडे लक्ष द्या.

४. सेक्टर रोटेशनचे महत्त्व: २०२० मधील विविध क्षेत्रांची कामिगिरी पहा. नफ्यात असलेल्या सर्वांचीच एकाचवेळी चांगली कामगिरी झाली नाही. एखाद्या क्षेत्राच्या कामगिरीबद्दल अंदाज बांधताना २०२१ या वर्षात अनेक नव्या घटकांचा विचार करावा लागेल. २०२० मध्ये लॉकडाऊननंतर आ‌वश्यक वस्तूंची मागणी वाढली आणि त्यानंतर सामान्य व उन्ननत पातळीदरम्यान चढ-उतार दिसून आला. उर्जा आणि युटीलिटीची मागणी कमी झाली. तर इतर क्षेत्रांना टेक स्टॉक्सनी मागे टाकले. इथे सेक्टर रोटेशन, ही संकल्पना लक्षात घेतली पाहिजे.

सेक्टर रोटेशन ही एक निरंतर प्रक्रिया असून तुमच्या पोर्टफोलिओत सतत काहीतरी वळणे मिळाली पाहिजेत. गुंतवणुकदारांपर्यंत खूप मोठी बातमी पोहोचते तेव्हा किंमतींवर अल्प किंवा मध्यम काळासाठी गंभीर परिणाम होतात. परिणामी आपला पोर्टफोलिओही प्रभावित होतो. त्यामुळे आपल्या पोर्टफोलिओचा नियमित आढावा घेऊन पुढे जाण्याची सवय ठेवा. जेणेकरून बाजारातील सर्वोत्तम संधी तुम्ही गमावणार नाहीत.

५. ठिपके जोडणारा रीबूट झालेला ग्राहक: मागील वर्षात तुम्ही जीवनशैली कशा प्रकारे बदलली? तुमचा खर्च व भविष्यातील योजना कशा बदलल्या? याच धर्तीवर इतर लोक देखील त्यांचे आयुष्य बदलण्याचा विचार करत असून गोष्टी बदलत असतील. २०२० ने नव्या सवयी अधोरेखित केल्या. तसेच सर्व उत्पन्न गटामध्ये खर्चाची व्याख्या बदलली आहे. त्यामुळे या सर्वाचा बाजारावर परिणाम होईल तसेच कंपन्यांच्या रिअल-टाइम परफॉर्मन्सवरदेखील प्रभाव पडेल.

पुढील वर्षीच्या पोर्टफोलिओ धोरणाचा विचार अधिक सर्जनशील पद्धतीने करा. मागील वर्षाने दिलेल्या धड्यांकडे दुर्लक्ष करू नका.

नवी सुरुवात नेहमीच कठीण असते. नव्याची सुरुवात करताना, आपण नेहमीच मागे काय घडले, ते तेथेच सोडले पाहिजे आणि एखाद्या नव्या विचाराने पुढे गेले पाहिजे. २०२१ या वर्षी बाजार रीबूट होताना, तुमच्याकडून उत्तम संधी गमावता कामा नये.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ADVERTISEMENT
Previous Post

स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री यांनी घेतली सात्वंन भेट

Next Post

पुण्यात ‘युके स्ट्रेन’चा शिरकाव! पिंपरी-चिंचवडमध्ये तीन प्रवासी पॉझिटिव्ह

Next Post
पुण्यात ‘युके स्ट्रेन’चा शिरकाव! पिंपरी-चिंचवडमध्ये तीन प्रवासी पॉझिटिव्ह

पुण्यात ‘युके स्ट्रेन’चा शिरकाव! पिंपरी-चिंचवडमध्ये तीन प्रवासी पॉझिटिव्ह

ताज्या बातम्या

विडणीत लागलेल्या आगीत 6 एकर ऊस जळून खाक; सुमारे 9 लाखांचे नुकसान

विडणीत लागलेल्या आगीत 6 एकर ऊस जळून खाक; सुमारे 9 लाखांचे नुकसान

January 16, 2021
फलटण येथे ना.श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते ‘कोवीड 19 लसीकरणा’चा आज शुभारंभ

फलटण येथे ना.श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते ‘कोवीड 19 लसीकरणा’चा आज शुभारंभ

January 16, 2021
फलटण तालुक्यात 81.74 % मतदान; सोमवारी मतमोजणी

फलटण तालुक्यात 81.74 % मतदान; सोमवारी मतमोजणी

January 16, 2021
सरदार बर्गे मंडळींच्यावतीने 18 मार्च रोजी साजरा होणार ‘खंडेराव शार्य दिन’ : दिनेशआप्पा बर्गेश्रीमंत हरजीराजे बर्गे प्रतिष्ठान व बर्गे मंडळींच्यावतीने ‘पानिपत स्मृती दिन’ साजरा

सरदार बर्गे मंडळींच्यावतीने 18 मार्च रोजी साजरा होणार ‘खंडेराव शार्य दिन’ : दिनेशआप्पा बर्गेश्रीमंत हरजीराजे बर्गे प्रतिष्ठान व बर्गे मंडळींच्यावतीने ‘पानिपत स्मृती दिन’ साजरा

January 16, 2021
‘हत्ती गेला आणि शेपूट उरले’‘लस’ जरी आली; तरी ‘ढिलाई’ कशासाठी?

‘हत्ती गेला आणि शेपूट उरले’‘लस’ जरी आली; तरी ‘ढिलाई’ कशासाठी?

January 16, 2021
राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा येत्या 27 जानेवारीपासून सुरु, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा येत्या 27 जानेवारीपासून सुरु, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

January 15, 2021
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरासरी 79 टक्के मतदान; राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची माहिती

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरासरी 79 टक्के मतदान; राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची माहिती

January 15, 2021
पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे 31 जानेवारी पर्यंत सुधारीत आदेश जारी

सातारच्या मेडीकल कॉलेजला मिळाले मूर्त स्वरूप ; ४९५ कोटी रुपये मंजूर

January 15, 2021
चोराडे येथे झालेल्या अपघातात शंकर महादेव पवार यांचा मूत्यू

चोराडे येथे झालेल्या अपघातात शंकर महादेव पवार यांचा मूत्यू

January 15, 2021
पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य द्या महाबळेश्वरमधील मुख्य बाजारपेठ, वेण्णा लेक परिसराचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी लगेच कार्यवाही करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य द्या महाबळेश्वरमधील मुख्य बाजारपेठ, वेण्णा लेक परिसराचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी लगेच कार्यवाही करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

January 15, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.