स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री यांनी घेतली सात्वंन भेट


स्थैर्य, सातारा, दि.९: राज्याचे ज्येष्ठ नेते व माजी सहकारमंत्री स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सात्वंन केले.  यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व  आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यांच्या कुटुंबीयांचे सात्वंन केले.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आदरांजली वाहिली व विलासकाका पाटील उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील व कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी कराडचे तहसिलदार अमरदिप वाकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित पाटील, तालुका पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे उपस्थित होते.  यावेळी  गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!