
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण, दि. २९ नोव्हेंबर : प्रभाग क्रमांक ६ मधील भाजप उमेदवार मंगलादेवी नाईक निंबाळकर आणि किरण राऊत यांनी मतदारांना फलटण शहराचा खुंटलेला विकास यावर बारकाईने विचार करण्याचे आवाहन केले आहे.
या दोन्ही उमेदवारांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अल्पावधीत रस्ते, रेल्वे, पाणी, प्रशासकीय सुविधा यासाठी दिलेले योगदान लक्षात घेण्यास सांगितले. फलटणला ‘जैसे थे’ न ठेवता पुढे नेण्याची धमक रणजितदादांमध्ये आहे, हे तुमच्या लक्षात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहराला विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे नेण्यासाठी नगरपरिषदेत सत्ता परिवर्तन आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी भाजप उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
एकंदरीत, भाजप उमेदवारांनी रणजितदादांच्या विकासाच्या धोरणांवर विश्वास व्यक्त करून सत्ता परिवर्तनासाठी मतदारांची साथ मागितली आहे.
