स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

श्रीक्षेत्र पंढरपूरला विशेष आराखडा व वारकऱ्यांसाठी सुखसोयी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
July 27, 2022
in देश विदेश

दैनिक स्थैर्य । दि. २७ जुलै २०२२ । मुंबई । आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या मंदिरात महापूजा करण्याचा मान मला मिळाला, हे माझं भाग्य समजतो. मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा असतात. चांगले रस्ते, पिण्याचं मुबलक पाणी, शौचालये असतात. त्याच प्रकारच्या सोयी सुविधा पंढरपुरात निर्माण करणार आहे. त्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आजपर्यंत जे झालं नाही ते पंढरपूरसाठी करणार असून पंढरपूरचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. महाराष्ट्रातील प्रमुख कीर्तनकारांनी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ गायनाचार्य ह भ प हरिभाऊ रिंगे महाराज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानपत्र रिंगे महाराजांना प्रदान करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे पुढे असेही म्हणाले की, केवळ हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कायम रहावेत यासाठी आम्ही शिवसेना खासदार-आमदारांनी वेगळी वाट निवडली आहे. आम्ही ही एक विचारांची लढाई लढतोय, बाळासाहेबांच्या तेजस्वी हिंदुत्वाच्या विचारांची ही लढाई आहे. हे हिदुत्व म्हणजे दुसऱ्या समाजाचा द्वेष नव्हे. हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार होत असताना त्याचा इतर धर्मावर परिणाम होणार नाही हीच भूमिका आमची कायम राहणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले. सर्वसामान्य लोकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नसल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. याप्रसंगी अंबरनाथचे आमदार डॉ बालाजी किणीकर, विश्वनाथ महाराज वारिंगे, पुरुषोत्तम महाराज उगले, मराठी  संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, अंबरनाथचे नगरसेवक सुभाष साळुंखे, नगराध्यक्ष चौधरी, आळंदीचे रविदास महाराज शिरसाट, संत मुक्ताबाई संस्थांनचे तुकाराम महाराज मेहुणकर, पैठणचे ज्ञानेश्वर महाराज इंगळे, ह भ प चंद्रभान सांगळे महाराज, मनोजकुमार गायकवाड  सिन्नरचे किशोर महाराज खरात, बदलापूरचे रवींद्र महाराज मांडे आदी पारमार्थिक क्षेत्रातील शेकडो वारकरी मंडळी उपस्थित होती. 

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

Related


Previous Post

छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये कारगील विजयदिनी वृक्षारोपण

Next Post

पोलिसांच्या घरांसाठी सर्वंकष आराखडा तयार करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

पोलिसांच्या घरांसाठी सर्वंकष आराखडा तयार करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्या

डॉल्बी का वाजू नये याचे उत्तर प्रशासनाने द्यावे – खासदार उदयनराजे भोसले यांचा साताऱ्यात रोखठोक पवित्रा

August 20, 2022

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीचे दर्शन

August 20, 2022

अवैधरित्या दारुची वाहतूक केल्याप्रकरणी एकावर कारवाई

August 20, 2022

दुष्काळ पीडित शेतकऱ्याच्या भावना समजून घेवून त्यांचे मनोबल वाढवा – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

August 20, 2022

युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

August 20, 2022

प्रवचने – दास विषयाचा झाला। सुखसमाधानाला आंचवला॥

August 20, 2022

माजी सैनिकांसाठी काम व क्षयरोग निर्मूलनासाठी बीड जिल्ह्यात होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

August 20, 2022

सातारा शहर परिसरातील दोन जुगार अड्ड्यांवर छापे

August 20, 2022

मुख्यमंत्री प्रणित जिल्हा शिवसेनेची जबाबदारी पुरुषोत्तम जाधव यांच्याकडे

August 20, 2022

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतले परळी वैजनाथाचे दर्शन

August 20, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!