फलटण विधानसभा मतदार संघांतर्गत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २४ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
२५५ फलटण (अ.जा) विधानसभा मतदारसंघांतर्गत सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांच्यामार्फत सर्व नागरिकांना व मतदारांना आवाहन करण्यात आले आहे की, भारत निवडणूक आयोगाने दि. ०१/०१/२०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.

या कार्यक्रमांतर्गत आगामी वर्षाच्या १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकास ज्या नागरिकांच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होणार आहेत अथवा झालेली आहेत, त्यांनी नमुना नं. ६ भरून आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवून घ्यावे. सदर पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये दि. २५ नोव्हेंबर व २६ नोव्हेंबर रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच दि. २ डिसेंबर व ३ डिसेंबर २०२३ रोजी दिव्यांग, तृतीयपंथी, देह व्यवसाय करणार्‍या महिला, बेघर भटया विमुत जाती जमातीच्या व्यतींसाठी विशेष शिबीर प्रत्येक गावात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या उपस्थिती आयोजित करण्यात येणार आहे.

तसेच सदर पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी, मतदार नोंद दुरूस्ती, मतदार यादीतून नाव वगळणे इ. कामकाज करण्याकामी आपले मतदार यादी भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे सर्वांना सहकार्य करतील. याशिवाय ऑनलाईन ‘वोटर हेल्पलाईन’ मोबाईल अ‍ॅप, ‘वोटर पोर्टल’ या संकेतस्थळावरून देखील घरबसल्या हे कामकाज करता येईल, अशी माहिती सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांनी दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!