सैनिकांच्या पत्नी कुटुंबाचा भक्कम आधार; सोनाली गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुक सैन्य

दलातील जवान विकास गायकवाड यांच्या पत्नी सोनाली गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या त्यागाचे व योगदानाचे मान्यवरांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

स्थैर्य, फलटण, दि. २२ जून : देशाच्या सीमांवर अहोरात्र सजग राहून राष्ट्ररक्षण करणाऱ्या सैनिकांप्रमाणेच त्यांच्या पत्नीचे कुटुंबातील योगदान अत्यंत महत्त्वाचे असते. याच भावनेतून, मौजे ढवळ (ता. फलटण) येथील सुपुत्र आणि भारतीय सैन्य दलातील जवान विकास गायकवाड यांच्या पत्नी सोनाली गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या कार्याचे आणि संयमाचे मान्यवरांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

कुटुंबाची समर्थपणे जबाबदारी

जवान देशसेवेसाठी घरापासून दूर असताना कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी खंबीरपणे सांभाळणे आव्हानात्मक असते. सोनाली गायकवाड या घरातील ज्येष्ठांचा सन्मान राखत कुटुंबाला एकत्र ठेवत आहेत. सैनिकाच्या पत्नीचे जीवन हे केवळ प्रतीक्षेचे नसून त्यात कर्तव्य, त्याग, संघर्ष आणि संयमाचा मोठा वाटा असतो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

मान्यवरांच्या सदिच्छा व मार्गदर्शन

जवानाच्या पत्नीचे जीवन हे समर्पण आणि जबाबदारीचे मूर्तिमंत उदाहरण असते, असे मत पारिजातिका जगताप यांनी यावेळी व्यक्त केले. भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्ह्याचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी गायकवाड परिवाराला मंगलमय वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या. तसेच बौद्धाचार्य विठ्ठल निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध धम्म संस्कार विधीनुसार मंगल विधी पार पडला.

विविध मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा शाखेचे माजी अध्यक्ष महावीर भालेराव, बाबासाहेब जगताप, रामचंद्र मोरे, बजरंग गायकवाड आणि आनंद जगताप उपस्थित होते. यासोबतच महावितरणचे अभियंता अविनाश अहिवळे, प्रा. संध्या अहिवळे, पंचायत समितीच्या माजी सदस्या कल्पना भालेराव, भाग्यश्री गायकवाड आणि अश्विनी मोरे यांच्यासह गायकवाड परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!