स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोलापूर : नव्या स्वरूपातील अडीच कोटी सात-बारांचे डिजिटलायझेशन, महसूलमंत्र्यांच्या परवानगीनंतर लवकरच होणार वाटप

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 5, 2021
in सोलापूर - अहमदनगर
ADVERTISEMENT

स्थैर्य, सोलापूर, दि.५:  राज्य शासनाने नवीन सात-बारा देण्यास सप्टेंबर २०२० मध्ये मंजुरी दिली. यानंतर आतापर्यंत राज्यातील सुमारे अडीच कोटी सातबारा उताऱ्यांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले असून लवकरच त्याचे वाटप सुरू होणार आहे. याबाबत माहिती देताना राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाचे राज्य समन्वयक रामदास जगताप म्हणाले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या परवानगीने या उताऱ्यांचे वाटप लवकरच सुरू केले जाणार आहे.

राज्यातील सर्वच जिल्ह्यांत नवीन सातबारा देण्याचे काम सुरू झाले आहे. सोलापूरमध्ये १० फेब्रुवारीपासून नवीन सातबारा शेतकऱ्यांच्या हाती देण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिली. यापूर्वी ३ मार्च २०२० ला महाराष्ट्र सरकारने सातबारा आणि आठ-अ उताऱ्यावर वरच्या बाजूला महाराष्ट्र शासनाचा आणि ई-महाभूमी प्रकल्पाचा लोगो टाकण्यास मान्यता दिली आहे. शिवाय आता नवीन सातबारा उताऱ्यावर गावाच्या नावासह कोड क्रमांकही येणार आहे.

ब्रिटिश काळात १९४१ मध्ये एम.जे. देसाई यांनी सुधारणा केल्या होत्या. त्यानंतर २०२० मध्ये राज्यात नवी महसूल रचना अमलात येत आहेत. नवीन सातबारामुळे जमीन कोणत्या प्रकाराची आहे, हे चटकन समजणार आहे. जमीनविषयक कामकाजात पारदर्शकता येऊन महसूलचे वाद कमी होण्यास मदत होणार आहेत. हेक्टर, आरसोबत अकृषक उताऱ्यावर चौरस मीटर नोंदले जाणार आहे. इतर हक्काच्या रकान्यात खातेदारांची क्रमांक युनिट क्रमांकांसह नोंद घेतली जाणार आहे.

गाव नमुना सातमध्ये हे 11 महत्त्वपूर्ण बदल होणार
१.
गावाच्या नावासोबत गावाचा कोड क्रमांक म्हणजेच लोकल गव्हर्नमेंट डिरेक्टरी टाकण्यात येणार आहे.
२. लागवडीयोग्य क्षेत्र आणि पोट खराब क्षेत्र स्वतंत्र दर्शवून त्यांची बेरीज करून एकूण क्षेत्र नमूद राहील
३. शेती क्षेत्रासाठी हेक्टर आर व चौरस मीटर तर अकृषक (एनए) क्षेत्रासाठी चौरस मीटर हे एकक राहील.
४. यापूर्वी खाते क्रमांक इतर हक्क या रकान्यात नमूद केला जात असे. आता तो खातेदाराच्या नावासमोर असेल.
५. यापूर्वी मृत खातेदार, कर्ज बोजे, ई-कराराच्या नोंदी कंसात दाखवत. आता ही माहिती कंसातच परंतु त्यावर एक आडवी रेष मारून असेल.
६. प्रलंबित फेरफारांची नोंद इतर हक्क रकान्यात स्वतंत्रपणे प्रलंबित फेरफार म्हणून राहील.
७. नवीन उताऱ्यात सर्वात शेवटी जुने फेरफार क्रमांक असा रकाना असेल, त्यात जुने फेरफार एकत्रित दर्शवले जातील.
८. खातेदार स्पष्टपणे लक्षात यावेत यासाठी दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेष राहील.
९. गट क्रमांकाशी संबंधित शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख म्हणजेच गट क्रमांकाशी संबंधित जमिनीचा जो शेवटचा व्यवहार झाला आहे, त्याची माहिती इतर हक्क रकान्यात सर्वात शेवटी शेवटचा फेरफार क्रमांक आणि दिनांक या पर्यायासमोर नमूद असेल.
१०. अकृषक (एनए) सातबारा उताऱ्यावरील जमिनीचे एकक आर चौरस मीटर राहणार असून यात पोट खराब क्षेत्र, जुडी व विशेष आकारणी, तसेच इतर हक्कात कूळ व खंड हे रकाने नसतील.
११. एनए उताऱ्यात शेवटी हे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रूपांतरीत झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना नंबर १२ ची आवश्यकता नाही, अशी स्पष्ट सूचना राहील.


ADVERTISEMENT
Previous Post

तात्या विंचूला मृत्यूंजय मंत्र देणारा ‘बाबा चमत्कार’ काळाच्या पडद्याआड : राघवेंद्र कडकोळ यांचे निधन

Next Post

मुंबई शेअर बाजाराचे भांडवल प्रथमच 200 लाख कोटींवर, सेन्सेक्सच्या चार सत्रांत 14.34 लाख कोटींची वाढ

Next Post

मुंबई शेअर बाजाराचे भांडवल प्रथमच 200 लाख कोटींवर, सेन्सेक्सच्या चार सत्रांत 14.34 लाख कोटींची वाढ

ताज्या बातम्या

प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे 37 हजार अर्ज रद्द

March 1, 2021

महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाने संपवली जीवनयात्रा

March 1, 2021

शांतिदुत परिवार व आयएमए असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

March 1, 2021

पूजा चव्हाणच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्र्यांना पत्र : ‘आमच्या मुलीची बदनामी केली जातेय, आम्ही संजय राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी केली नाही’

March 1, 2021

सीताराम कुंटेंनी स्वीकारला राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार, कोण आहेत सीताराम कुंटे?

March 1, 2021

अजित पवारही देवेंद्र फडणवीसांना भिडले, अधिवेशनाआधी दिलं खुलं आव्हान

March 1, 2021

चौथ्या कसोटीची खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमात

March 1, 2021

‘जंगजौहर’ बनला ‘पावनखिंड’, चित्रपटाची रिलीज डेटही आली समोर

February 28, 2021

चंद्रकांत पाटलांचा पवारांना सल्ला : ‘जे धाडस उद्धव ठाकरेंनी दाखवले, तेच शरद पवारांनी धनंजय मुंडेंच्या मुद्द्यावर दाखवायला हवे’

February 28, 2021

देवेंद्र फडवणीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांचा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा हल्ला

February 28, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.

×