दैनिक स्थैर्य | दि. ३ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२०२४ कार्यक्रमाअंतर्गत माती व पाणी परीक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
कृषीकन्या सिद्धी शेटे, साक्षी जाधव, समृद्धी जगताप, सिद्धिका कांबळे, स्वेजल पाटील, प्रियांका शिंदे, प्रियांका भोसले व श्वेता सस्ते यांनी माती व पाणी परिक्षण का करावे व कसे करावे, या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमास विशेष मार्गदर्शक म्हणून कृषी महाविद्यालयाच्या माती व पाणी परीक्षण तज्ञ प्राध्यापिका डॉ. प्राजक्ता खरात मॅडम लाभल्या. त्यांनी माती व पाणी परीक्षण शेतीसाठी का व कसे करावे, या विषयावर शेतकर्यांना विशेष मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास गावचे सरपंच श्री. नामदेव भांडवलकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. सचिन महामुनी, श्री. गणेश भिवरकर, कृषी सहाय्यक सरक मॅडम तसेच ग्रामसेवक श्री. ढोबळे सर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली.
माती परिक्षण तज्ञ प्राध्यापिका प्राजक्ता खरात यांनी माती परिक्षणाअंतर्गत मातीचे नमुने कसे गोळा करावे, माती परिक्षणाअंतर्गत मातीतील कोणत्या पोषक मूलद्रव्यांचे चाचणी केली जाते, तसेच माती व पाणी परीक्षणाचे फायदे इ.ची माहिती सविस्तररित्या शेतकर्यांना दिली.
शेतकर्यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वय प्रा. नीलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित, प्राध्यापिका डॉ. प्राजक्ता खरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.