श्रीमती यशोदाबाई गावडे यांचे वृद्धापकाळाने निधन


दैनिक स्थैर्य | दि. २६ मे २०२३ | फलटण |
गोखळी (ता. फलटण) येथील श्रीमती यशोदाबाई शंकरराव गावडे (वय ९६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्याच्या पश्चात एक विवाहित मुलगा, पाच विवाहित मुली, सुना, नातवंडे असा सर्व उच्चशिक्षित परिवार आहे.

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक, गोखळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच डॉ. राधेश्याम गावडे यांच्या मातोश्री तर जिल्हा परिषद सदस्या सौ. उषादेवी गावडे यांच्या चुलत सासूबाई होत. फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष स्व. अ‍ॅड. कैलासराव गावडे यांच्या मातोश्री होत.

राहत्या घरापासून निघालेल्या श्रीमती यशोदाबाई गावडे यांच्या अंत्ययात्रेमध्ये पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, धार्मिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नातेवाईक सहभागी झाले होते. गोखळी येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!