कांबळेश्वरमध्ये राजे गटाला धक्का; विठ्ठलराव भिसे यांचा सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश

कांबळेश्वर (ता. फलटण) येथील राजे गटाचे नेते विठ्ठलराव भिसे यांनी सहकाऱ्यांसह माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १३ ऑगस्ट : कांबळेश्वर (ता. फलटण) येथील भिवाई देवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठलराव भिसे यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांसह राजे गटातून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.

जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील आणि स्वराज्य पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी विठ्ठलराव भिसे यांच्यासोबत बाबुलाल भिसे, शंकरराव लकडे, सचिन खताळ, संभाजी नरुटे, संताजी भिसे आणि गोपाळ भिसे यांनीही भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी विजय भिसे, बापू शिंगाडे, अमोल सस्ते, तानाजी मदने, दत्तू भिसे, प्रभाकर भिसे, बाळासाहेब कोळेकर, पोपट भिसे, संजय तांबे, खंडेराव भिसे, बाळासाहेब धायगुडे, संदीप शिंदे आणि गौतम ठोंबरे यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!