गिरवीत विविध विकासकामांचे भूमिपूजन; रणजितसिंह व आमदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नांतून निधी मंजूर

गिरवी (ता. फलटण) येथे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या निधीतून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

स्थैर्य, गिरवी, दि. १३ ऑगस्ट : माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून गिरवी (ता. फलटण) येथे मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर आणि स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ झाला.

मंजूर झालेली महत्त्वपूर्ण विकासकामे

या विशेष निधीतून गिरवी गावांतर्गत अनेक विकासकामे मार्गी लागणार आहेत. यामध्ये वाघजाई रस्ता सुधारणा भाग १, भाग २ आणि भाग ३, गुरवदरा रस्ता सुधारणा तसेच सोनारमळा खांडेवस्ती रस्ता सुधारणा या महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे. याशिवाय जाधव-वाडा येथे नवीन सभामंडप बांधण्यात येणार आहे. या प्रत्येक कामासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली असून, यामुळे गावातील पायाभूत सुविधा आणि दळणवळण अधिक मजबूत होणार आहे.

मान्यवर आणि ग्रामस्थांची उपस्थिती

या विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी गावातील अनेक मान्यवरांनी पुढाकार घेतला. यावेळी जगदीश ऊर्फ बाळासाहेब कदम, संजय कदम, बाळासाहेब कदम, संभाजी कदम, सतीश मदने, दिलीप कदम, यशवंत कदम, शिवाजी जाधव, दत्ता जाधव, बाबू क्षीरसागर, पांडुरंग जाधव आणि विकास नाळे यांच्यासह परिसरातील नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!