
दैनिक स्थैर्य । दि.३१ मार्च २०२२ । मुंबई । आर्थिक वर्ष २०२१-२२ ची सांगता होत असताना फायनान्ससंदर्भातील अनेक बाबींचे पुनर्मूल्यांकन करण्याची वेळ आली आहे. तुम्हाला कपातींचा दावा, करबचत आणि निव्वळ नफा वाढवण्याचे मार्ग शोधावे लागतील. सामान्यत: शेवटच्या क्षणी कोणतेही घाईघाईने निर्णय घेणे टाळण्यासाठी वर्षाच्या सुरूवातीलाच कर नियोजन करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला कर-बचत करणा-या गुंतवणूकीचे नियोजन केल्यास तुम्हाला आर्थिक ध्येये संपादित करण्यासाठी योग्य गुंतवणूका व बचत उत्पादने निवडण्यास मदत होते. तसेच गुंतवणूकीशी संबंधित खर्च वाढल्याने एका महिन्यामधील आर्थिक ताण टाळण्यास देखील मदत होते.
पण तुम्ही वर्षभर गुंतवणूका केल्या नसतील तर काही युक्त्या व गुंतवणूका तुम्हाला मदत करू शकतात. प्रथम बाब म्हणजे तुम्हाला वर्षामध्ये मिळणा-या उत्पन्नाचे मूल्यांकन करावे लागेल. यामुळे तुम्हाला कर-बचत करणा-या साधनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम निश्चित करण्यास मदत होईल. पुढील पायरी म्हणजे तुमच्या मोठ्या खर्चांची यादी तयार करणे, जे संपूर्ण वर्षादरम्यान गुंतवणूका म्हणून असू शकतात. यानंतर तुम्हाला किती अधिक गुंतवणूकांची गरज आहे याचे गणन करा. या बाबींचे अवलोकन केल्यानंतर एंजेल वन लिमिटेडचे इक्विटी स्ट्रॅटजिस्ट श्री ज्योती रॉय यांनी खाली काही गुंतवणूक व करसंदर्भातील युक्त्या दिल्या आहेत, ज्या तुम्ही वापरू शकता:
एनपीएस व पीपीएफमध्ये गुंतवणूक करा: राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) यामध्ये गुंतवणूक करणे हा बचतीसह करलाभांचा दावा करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. पीपीएफ कर-मुक्त व्याज आणि वार्षिक १.५ लाख रूपये कपात असा दुहेरी फायदा देते. एनपीएस ही एक पेन्शन योजना आहे, जेथे तुम्ही कलम ८०सीसीडी (१), ८०सीसीडी(२) आणि ८०सीसीडी(१ब) च्या माध्यमातून जवळपास २ लाख रूपयांच्या करलाभाचा दावा करू शकता.
१ लाख रूपयांच्या स्टॉक गुंतवणूकीवर कर बचत: दीर्घकालीन गुंतवणूकदार म्हणून तुम्ही त्वरित नफा काढण्याच्या विचाराच्या विरोधात असू शकता. पण लक्षात ठेवा की, तुमचा दीर्घकालीन भांडवली नफा १ लाख रूपयांपेक्षा अधिक असल्यास त्यावर कर आकारला जाईल. तुम्ही एलटीसीजीमध्ये १ लाख रूपयांच्या टप्प्यावर असाल तर त्वरित मिळालेला नफा काढून घ्या. १ लाख रूपयांपेक्षा कमी नफा काढून घेणे हे उत्तम पाऊल आहे, ज्यामुळे कर बचत होते. तुम्ही पुढील आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला स्टॉक्स परत खरेदी करू शकता.
आरोग्य व जीवन विमा हप्ते: कर बचत करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आरोग्य व जीवन विमा. तुमच्या वैद्यकीय केअरला कव्हर करणा-या पॉलिसींसाठी भरले जाणारे आरोग्य विमा हप्ते कर-सवलतीस पात्र आहेत. यामुळे करपात्र उत्पन्न कमी होते, परिणामत: कर दायित्व कमी होते. तुम्ही कुटुंबामधील एकमेव कमावती व्यक्ती असण्यासोबत आईवडिल, पती/पत्नी व मुलांच्या आरोग्य विमाचे हप्ते भरत असाल तर तुम्ही आयकर कायद्याच्या कलम ८०ड अंतर्गत कपातीसाठी पात्र आहात. तुम्ही स्वत:साठी, पती/पत्नीसाठी व अवलंबून असणा-या मुलांसाठी प्रति आर्थिक वर्ष जवळपास २५,००० रूपयांपर्यंत कर कपातीचा दावा करण्यास पात्र आहात. तुम्ही अवलंबून असणा-या आईवडिलांसाठी आरोग्य विमा हप्ते भरत असाल आणि ते ज्येष्ठ नागरिक नसतील तर तुम्ही २५,००० रूपयांच्या अतिरिक्त कपातीसाठी पात्र आहात. तसेच तुमचे आई-वडिल किंवा दोघांपैकी एक ज्येष्ठ नागरिक असतील तर ही मर्यादा ५०,००० रूपयांपर्यंत वाढते. एकूण एखाद्या व्यक्तीला स्वत:साठी आणि पालकांसाठी आरोग्य विमा पॉलिसी खरेदी केल्यास कर कपातींमधून जवळपास ७५,००० रूपये मिळू शकतात.
तसेच जीवन विमा घेतल्यास आयकर कायदा १९६१ च्या कलम ८०क अंतर्गत कर लाभ मिळतात. एखादी व्यक्ती जीवन विमा पॉलिसीच्या हप्त्यासाठी प्रतिवर्ष जवळपास १५०,००० रूपयांचा दावा करू शकते. तुमच्या स्वत:साठी, पती/पत्नीसाठी किंवा मुलांसाठी प्लान्सच्या हप्त्यांवर कर बचत करता येऊ शकते.
गृह कर्ज: समजा तुम्ही गृह कर्ज घेतले आहे आणि आता व्याजासह कर्जाची परतफेड करत आहात. यासंदर्भात तुम्हाला माहित असले पाहिजे की, तुम्ही कलम ८०क अंतर्गत मुद्दल परताव्यावर जवळपास १.५ लाख रूपयांची कर कपात आणि कलम २४ब अंतर्गत व्याज परताव्यावर जवळपास २ लाख रूपयांच्या कर कपातीसाठी पात्र आहात.
कर बचत करण्यासाठी या काही युक्त्या असल्या तरी लक्षात घ्या की अंतिम मुदत चुकवून कोणतेही प्रलंबित कर परतावे दाखल करणे उत्तम विचार नाही आणि यामुळे अतिरिक्त दंड भरावा लागू शकतो. चेकलिस्ट तपासा आणि तुमच्यापरीने अधिकाधिक बचत करा. पुढील वर्षासाठी अगोदरच नियोजन करा.