श्रीराम जवाहर साखर उद्योगाचे सुमारे दीड कोटीहून अधिक पेमेंट ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा


 

स्थैर्य, फलटण दि. १९ : श्रीराम सहकारी साखर कारखान्याने यावर्षीच्या हंगामात दि. २९ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ६०५९.३७० मे. टन ऊसाचे गाळप केले असून त्याची एफ. आर. पी. प्रति टन २५९२.१० प्रमाणे होणारी संपूर्ण रक्कम १ कोटी ५७ लाख ६ हजार ४९३ रुपये संबंधीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत असल्याचे श्रीरामचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी सांगितले.

दि. १ ते १५ नोव्हेंबर दरम्यान गाळपास आलेल्या ऊसाचे एफ. आर. पी. प्रमाणे संपूर्ण पेमेंट डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात संबंधीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल असे श्रीराम जवाहरचे इनचार्ज प्रोजेक्ट मॅनेजर मानसिंग पाटील यांनी सांगितले. 

डॉ. सुमेध मगर यांना युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथे विशेष अभ्यास शाखेत प्रवेश

श्रीराम सहकारी साखर कारखाना चालविणाऱ्या श्रीराम जवाहर सहकारी साखर उद्योगाने यावर्षीच्या गळीत हंगामात आज अखेर ५५७७७ मे. टन ऊसाचे गाळप करुन ५५७०० साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा १०.२१ % मिळाला असल्याचे श्रीरामचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे व कार्यकारी संचालक चंद्रकांत तळेकर यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!