श्रीमंत रामराजे साहेब जनता मला रंगावर नाही तर कामावर निवडून देते : अशोकराव जाधव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 16 सप्टेंबर 2024 | फलटण | लोकनेते स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी राजकारणाची गरज ओळखून आपल्याला पुण्यावरून फलटणला आणले आहे. त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. आता पुन्हा पुण्याला पाठविण्याचाही साक्षीदार मीच असणार आहे. लोकनेत्यांच्या विषयी चांगले बोलता येत नसेल तर निदान वाईट तरी बोलू नका. माझे नाव घेवून सतत वारकरी संप्रदायाचा अपमान करण्याचे थांबवा! नाहीतर हाच वारकरी संप्रदाय आपल्याला धडा शिकवल्या शिवाय रहाणार नाही. श्रीमंत रामराजे साहेब आपण या सर्व गोष्टींच्या सोबत हे सुद्धा लक्षात ठेवा की; मलठण मधील लोक मला माझे रंगावर नाही तर कामावर निवडून देतात याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी आली आहे; असे मत फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले.

फलटण नगर परिषद मधील विकासाचे कुठल्याही कामाला मी विरोध केलेला नाही. पण विकासाच्या नावाखाली शासनाचा पैसा बेकायदेशीर रित्या जो खात आहात त्याला जरूर विरोध केला आहे व या पुढे सुद्धा करत राहणार आहे. सोमवार पेठेतील सर्व्हे नंबर 53 व 54 नागरिकांची पक्की घरे उठवून बेकायदेशीर रित्या खोटा पंचनामा व ठराव करून शासनाचे 25 कोटी लटनाऱ्यांच्या विरोधात जरूर आवाज उठवला आहे. सिटी सर्व्हे 6484, 6484 a,6486 या सार्वजनिक वापरासाठी असणाऱ्या आरक्षित मालमत्ता बिल्डरांना विकून खाणार असाल तर आवाज उठवला तर आमचे काय चुकले आहे? माळजाई मंदीर जवळील सोसायटीचे जागेत बेकायदेशीर कॉम्प्लेक्स उभारून विकणाऱ्या सत्ताधारी वर अर्ज केला तर काय चुकले? गेली 5 ते 7 वर्षे फलटण शहरातली रस्त्या विषयी, आरोग्य विषयी, अनियमित पाणी पुरवठया विषयी अर्ज केला तर काय चुकले? कोणाच्या तरी मर्जी खातर फलटण शहरातली मालमत्ता कर दुप्पट केला त्या विषयी आंदोलन केले तर काय चुकले याचा विचार शहरातली जनता करणारच आहे; असेही मत जाधव यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना जाधव म्हणाले की; श्रीमंत संजीवराजे साहेब पांडुरंग गुंजवटेने एका शासकीय नोकरीत असलेल्या महिलेचा हात धरलेला आहे. हा गुन्हा 307 चे गुन्ह्या पेक्षाही फार भयानक व लाजिरवाणा आहे. एखाद्या गुंडा पेक्षाही नालायक कृती त्याने केलेली आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्याला पाठीशी घालून महिलांवरील अत्याचाराला एक प्रकारे प्रोत्साहन देत आहात का ? असा प्रश्न आता नागरिकांच्या मनात उपस्थित राहत आहे.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे वरील टीका या पुढे खपवून घेतली जाणार नाही त्यास जशास तसे उत्तर दिले जाईल; असेही जाधव यांनी स्पष्ट केले आहे.


Back to top button
Don`t copy text!