दैनिक स्थैर्य | दि. 15 सप्टेंबर 2024 | फलटण | दैनिक स्थैर्यचे अधिकृत अँड्रॉइड ॲप हे फक्त गुगल प्ले स्टोअरवरच उपलब्ध आहे. इतर कोणत्याही ठिकाणी ते उपलब्ध नाही. तरी कोणत्याही प्रकारच्या फेक मेसेज द्वारे आपल्या apk व लिंक द्वारे आलेले ॲप वाचकांनी डाऊनलोड करू नये.
“स्थैर्य”ची वाढती लोकप्रियता व सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य वाचकांचा जो विश्वास दैनिक “स्थैर्य”वर आहे. “स्थैर्य” मीडिया समूहाने कोणत्याही प्रकारचे ॲप आता तयार करून पाठवले नाही. “स्थैर्य”चे अधिकृत ॲप हे फक्त गुगल प्ले स्टोअर वरच उपलब्ध आहे. इतर कोणत्याही नंबर वरून अगदी “स्थैर्य”च्या WhatsApp ग्रुप मध्ये समाविष्ट असलेल्या नंबर वरून जरी मेसेज द्वारे किंवा apk फाईल द्वारे ॲप आले तरी ते डाऊनलोड करू नये. या माध्यमातून हॅकर्स तुमचा डेटा चोरी करू शकतात व त्याचा गैरफायदा घेवू शकतात.
“स्थैर्य” मीडिया समूह अश्या सर्व ॲपचे समर्थन करीत नाही किंवा त्याची जबाबदारी सुद्धा घेत नाही. “स्थैर्य” चे अधिकृत ॲप हे फक्त गुगल प्ले स्टोअरवरच उपलब्ध आहे इतर कोठेही नाही. तरी वाचकांनी अश्या मेसेजेस द्वारे आलेल्या लिंक किंवा apk द्वारे आलेल्या फाईल डाऊनलोड करू नये.