
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. ०८ जुलै २०२२ । मुंबई । सातारा जिल्ह्याचे नेते व विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निवडणुक लढवून विधान परिषदेवर निवडून आलेले आहेत. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ विधानपरिषदेच्या उपसभापती ना. निलम गोऱ्हे यांच्याकडून घेतली.

विधानपरिषदेच्या सभागृहात आज नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा विधानपरिषदेच्या उपसभापती ना. निलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह निवडून आलेल्यांना सर्व सदस्यांना आज उपसभापती ना. निलम गोऱ्हे यांनी शपथ दिली.

