श्रीमंत रघुनाथराजे मोफत ध्वज देणार


दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑगस्ट २०२२ । फलटण । भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली असल्यामुळे या वर्षी “अमृत महोत्सवी” सोहळा मोठ्या थाटामाटात सर्व देशभर संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून “हर घर तिरंगा” अभियानासाठी मोफत “तिरंगा ध्वज” पुरविण्यात येणार आहे.

या “अमृत महोत्सवी वर्षात” सर्व देशभर वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये यामध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, त्याचबरोबर वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे असे अनेक उपक्रम साजरे करून करून हे “अमृत महोत्सवी” वर्ष साजरे करावयाचे आहे.

या अभियानाची सुरुवात फलटण येथील गजानन चौक येथे ओबीसी नेते दादासाहेब चोरमले यांच्या शुभहस्ते करण्यात आली.

यावेळी प्रितसिंह खानविलकर, अमरसिंह पिसाळ, बाळासाहेब चोरमले, ओंकार चोरमले, पै.पप्पूभाई शेख, पै. अभिजीत जानकर, सचिन तेली, दगडू शिंदे, प्रकाश चोरमले, विकास चोरमले, अमोल राऊत, अजित राऊत, विशाल तेली इ. मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी “पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर रिक्षा स्टॉप” चे सर्व रिक्षा चालक यांना तसेच अनेक उपस्थित नागरिकांना यावेळी मोफत तिरंगा ध्वज वाटप करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!