जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये श्री जानाई हायस्कूल राजाळे शाळेचा ज्युदोत प्रथम क्रमांक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २७ सप्टेंबर २०२४ | फलटण |
क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्या वतीने सातारा या ठिकाणी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे श्री जानाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, राजाळे (ता. फलटण) या शाळेच्या शिवम समाधान निंबाळकर (१७ वर्षांखालील गटात ४५ किलो वजनी गटात) या विद्यार्थ्याने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला.

या यशाबद्दल शिवमचा सत्कार श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या हस्ते करण्यात आला व त्यास कोल्हापूर या ठिकाणी होणार्‍या विभागीय स्पर्धेकरीता शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी श्री जानाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज राजाळेच्या प्राचार्या सौ. गायकवाड मॅडम व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. समाधान निंबाळकर, क्रीडा शिक्षक श्री. बाचल उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!