व्हाइट हाऊस बाहेर गोळीबार – डोनाल्ड ट्रंप


 

स्थैर्य, दि. ११ : व्हाइट हाऊसच्या बाहेर गोळीबार झाल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिली आहे.

व्हाइट हाऊसमध्ये एक पत्रकार परिषद सुरू होती आणि स्वतः ट्रंप पत्रकारांसोबत संवाद साधत होते. त्याचवेळी त्यांचे काही सुरक्षारक्षक त्यांच्याजवळ आले. त्यांनी ट्रंप यांना काहीतरी सांगितलं आणि ट्रंप पत्रकार परिषद मध्येच सोडून निघून गेले.

जवळपास नऊ मिनिटांनी ट्रंप परत आले आणि त्यांनी म्हटलं, की आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

त्यांनी पत्रकारांना सांगितलं की, अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसच्या कर्मचाऱ्यांनी काही हत्यारधारी संशयितांवर गोळीबार केला आहे.

त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार या घटनेनंतर कोणाला तरी हॉस्पिटलमध्येही नेण्यात आलं आहे.

ही अतिशय अभूतपूर्व परिस्थिती असल्याचं ट्रंप यांनी म्हटलं. सिक्रेट सर्व्हिसच्या लोकांनी अतिशय चोखपणे त्यांचं काम केलं आहे, असंही ट्रंप यांनी म्हटलं.

“व्हाइट हाऊसच्या बाहेर गोळीबार झाला, पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे. एका व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलंय. त्याच्या प्रकृतीबद्दल मला सध्या तरी काही माहीत नाहीये.”

ट्रंप यांनी पुढे म्हटलं, की हे खरंच खूप वाईट आहे. पण जग नेहमीच धोकादायक ठिकाण आहे. ही काही नवीन बाब नाहीये.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!