अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार; कानाला गोळी लागली, शूटर ठार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १४ जुलै २०२४ | वॉशिंग्टन |
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे एका रॅलीत ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला. बटलरमध्ये ते मंचावर बोलत असताना बंदुकीच्या गोळीचा आवाज आला. ट्रम्प यांनी उजव्या कानावर हात ठेवला आणि खाली वाकले. सीक्रेट सर्व्हिस एजंट ट्रम्प यांना कव्हर करण्यासाठी तातडीने त्यांच्याजवळ पोहोचले.

सुरक्षा रक्षकांनी डोनाल्ड ट्रम्प यांना उभे राहण्यास मदत केली तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर आणि कानावर रक्त दिसत होते. यावेळी ट्रम्प यांनी आपली मुठ घट्ट धरली आणि ती हवेत हलवली. त्यानंतर गुप्तहेरांनी ट्रम्प यांना स्टेजवरून उतरवून कारच्या मदतीने रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली.

या घटनेविषयी ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागात गोळी लागली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले की, मला कानाजवळ एक आवाज जाणवला, त्यामुळे काहीतरी चुकीचे घडल्याची बाब लगेच माझ्या लक्षात आली. खूप रक्तस्त्राव झाला. त्यानंतर काय घडले ते कळाले.

अमेरिकेत ५२ वर्षांनंतर राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारावर हल्ला झाला आहे. यापूर्वी १९७२ मध्ये जॉर्ज सी वॉलेस यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती. ते राष्ट्रपतीपदाचे उमेदवारही होते. एका शॉपिंग सेंटरमध्ये त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यानंतर ते मरेपर्यंत व्हील चेअरवरच राहिले.

यापूर्वी १९७२ मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचे भाऊ रॉबर्ट एफ केनेडी यांच्यावर हल्ला झाला होता. लॉस एंजेलिसमधील निवडणूक प्रचार आटोपून ते परतत होते.

हल्लेखोर ट्रम्प यांच्याच पक्षाचा आहे – एफबीआय

अमेरिकेची तपास संस्था एफबीआयने म्हटले आहे की, हल्लेखोर थॉमस मॅथ्यू क्रुक्सच्या मतदार ओळखपत्रावरून तो ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा असल्याचे दिसून आले आहे. तथापि, त्यांनी १५ डॉलर्स म्हणजे १२५० रुपये बायडेन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाशी संबंधित असलेल्या एका गटालाही दान केले होते.


Back to top button
Don`t copy text!