![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2022/07/Raigad-Univ.jpg?resize=780%2C451&ssl=1)
दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२२ । आटपाडी । महाराष्ट्रातील व संपूर्ण भारतातील सर्व शिवभक्त यांना कळविण्यात आनंद होतोय की, अवघ्या शिवभक्तांचा लोकोत्सव समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक परीक्षा प्रथम व द्वितीय वर्ष अभ्यासक्रम १० जुलै पासून १५ ऑगस्ट पर्यंत होत आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज व महाराष्ट्रातील सर्व गडकिल्ले यांच्या ओजस्वी इतिहासावर आधारित ही राष्ट्रीय परीक्षा असणार आहे, या मांडणी ऐतिहासिक परीक्षेचे रूपाने आपले शिवभक्त एकत्र यावे आणि ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म ‘या पंक्ती प्रमाणे काश्मीर वाढवावा’ या कन्याकुमारी व देखील श्री शिवरायांच्या वर आधारित व्हावी व आपल्या महापुरुषांचा तेजस्वी इतिहास समाजातील प्रत्येक घरा- घरात व घरातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहचवणे हेच ध्येय समोर ठेऊन विश्वविद्यालयाची वाटचाल सुरू आहे. या वर्षी भाषेचे पर्याय देण्यात आलेले आहेत विद्यार्थ्यांना आवडेल त्या भाषेत ते परीक्षा देऊ शकतात, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेचे पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याच बरोबर ६ ते १०० वयोगटातील प्रत्येक व्यक्ती परीक्षेस बसण्यास पात्र आहे, योग्य अभ्यासक्रम स्वरूप, परीक्षेची व्यवस्था प्रत्येक जिल्ह्यात ३-४ ठिकाणी परीक्षा केंद्र अश्या पद्धतीने समिती द्वारे पूर्व तय्यारी केली गेलेली आहे. समितीचे महाराष्ट्र राज्यात खूप सभासद कार्यरत आहेत, जे ह्या पवित्र कार्याला यशस्वी करण्यासाठी झटत आहेत. मागील वर्षी कोरोनाच्या अवघड काळात देखील महाराष्ट्र भर ३६ जिल्ह्यात १०० पेक्षा जास्त परीक्षा केंद्रावर ऐतिहासिक परीक्षा सांस्कृतिक पोशाख परंपरा जपत यशस्वी रित्या झाली. या वर्षी १० जुलै पासून प्रारंभ होत असलेल्या प्रवेश प्रक्रिया समितीच्या अधिकृत संकेतस्थळ या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात मुख्य परीक्षा अस स्वरूप असणार आहे. राष्ट्रीय पातळीवर पहिला क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास ‘इतिहास श्री २०२२’ हा मानाचा किताब दिला जाणार आहे. प्रथम व द्वितीय अभ्यासक्रम प्रारंभ होत आहे या ऐतिहासिक परीक्षा अभ्यासक्रमात आपण सहभागी व्हावे असे आव्हान श्री रायगड ऐतिहासिक विश्वविद्यालय संस्थापक/अध्यक्ष रायगडपुत्र ह.भ.प.श्री.आकाश भोंडवे पाटील आणि सांगली जिल्हा, आटपाडी तालुका प्रमुख बालाजी शामराव बाड यांनीही आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संपर्क – 8805080896 संकेतस्थळ – https://raigadvishwavidyalay.com/