फलटण तालुक्यातील १०२ ग्रामपंचायतींच्या सदस्य आरक्षणाची सोडत ८ ते ११ जून दरम्यान; सविस्तर कार्यक्रम जाहीर


आगामी सार्वत्रिक निवडणुकांची प्रशासकीय तयारी सुरू; विशेष ग्रामसभा घेऊन काढणार प्रभागनिहाय आरक्षण

स्थैर्य, फलटण, दि. 5 जून : फलटण तालुक्यातील सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या आणि सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा सविस्तर कार्यक्रम प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. तालुक्यातील एकूण १०२ ग्रामपंचायतींची ही आरक्षण सोडत ८ जून ते ११ जून २०२६ या कालावधीत संबंधित गावांमध्ये विशेष ग्रामसभा घेऊन काढण्यात येणार आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने प्रशासनाने ही महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.

वेळापत्रक आणि कार्यपद्धती:

प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार, या आरक्षण सोडतीसाठी दररोज सकाळ आणि दुपार अशी दोन सत्रे निश्चित करण्यात आली आहेत. सकाळ सत्राची वेळ ठीक ११.०० वाजता, तर दुपार सत्राची वेळ ठीक ०३.०० वाजता असणार आहे. या वेळेत विशेष ग्रामसभा बोलावून ग्रामपंचायत प्रभागनिहाय सदस्यांच्या आरक्षणाची सोडत पार पडेल.

दिनांकनिहाय आरक्षण सोडतीचा सविस्तर कार्यक्रम खालीलप्रमाणे:

  • दि. ८ जून २०२६ (२० ग्रामपंचायती): वडजल, फडतरवाडी, ढवळवाडी (आसू), शेरेचिंदेवाडी, माझेरी, टाकळवाडे, पिराचीवाडी, शेरेचीवाडी (ढवळ), नाईकबोमवाडी, निंबळक, वडगाव, बीबी, माळेवाडी, शिंदेमाळ, दालवडी, मिरेवाडी (दालवडी), सोनवडी खुर्द, सोनवडी बु., रावडी खुर्द आणि रावडी बु.

  • दि. ९ जून २०२६ (२८ ग्रामपंचायती): ढवळवाडी (निं), निंभोरे, आसू, गुणवरे, धुळदेव, अलगुडेवाडी, मिरगाव, खडकी, मिरढे, जावली, कापशी, आळजापूर, आरडगाव, विठ्ठलवाडी, तावडी, जोर (कुरवली खुर्द), ठाकूरकी, फरांदवाडी, मुरुम, खामगाव, गोळेवाडी, गोळेगाव, शिंदेगर, हणमंतवाडी, तिरकवाडी, सासकल, खराडेवाडी आणि डोंबाळवाडी.

  • दि. १० जून २०२६ (२८ ग्रामपंचायती): खुंटे, शिंदेवाडी, साठे, सरडे, सांगवी, सोनगाव, मलवडी, नांदल, आंदरुड, कुरवली बु., घाडगेवाडी, हिंगणगाव, कोरेगाव, तांबवे, धुमाळवाडी, बोडकेवाडी, झिरपवाडी, जाधववाडी (फ), होळ, काळज, उळूंब, जोर (वाखरी), वाघोशी, को-हाळे, भाडळी बु., भाडळी खुर्द, तडवळे आणि टाकोबाईचीवाडी.

  • दि. ११ जून २०२६ (२६ ग्रामपंचायती): सस्तेवाडी, गोखळी, खटकेवस्ती, कांबळेश्वर, राजाळे, वाखरी, ढवळ, राजुरी, मुंजवडी, शेरेचीवाडी (हिं), सासवड, कापडगाव, तरडगाव, विंचुर्णी, निरगुडी, कोळकी, साखरवाडी, जिंती, जाधववाडी (आसू), पवारवाडी, काशिदवाडी, भिलकटी, परहर खुर्द, चांभारवाडी, मुळीकवाडी आणि घाडगेमळा.

नागरिकांना आवाहन:

तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने प्रभागनिहाय आरक्षणाची ही सोडत अत्यंत महत्त्वाची आहे. या आरक्षण सोडतीनंतर गावागावांतील राजकीय चित्र स्पष्ट होणार असल्याने, संबंधित गावातील ग्रामस्थांनी व इच्छुकांनी नमूद केलेल्या तारखांना आणि वेळेत होणाऱ्या विशेष ग्रामसभांना उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!