सात वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार


लिंब गोवे येथील युवकावर पोस्को अंतर्गत गुन्हा

स्थैर्य, सातारा दि 12 : मोबाईल खेळायला देतो, असे सांगून घरात बोलावून 7 वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी लिंब गोवे, ता. सातारा येथील युवकास अटक झाली असून त्यच्यावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मंगेश उर्फ गोट्याभैय्या प्रकाश शिंदे असे संशयीताचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी, लिंब गोवे येथे संशयीत मंगेश शिंदे राहतो. त्याने दि. 10 रोजी दुपारी 2 च्या सुमारास संबंधित 7 वर्षाच्या बालिकेला मोबाईलवर खेळायला देतो, असे सांगून घरात बोलावून घेतले. तेथे मोबाईलवर गेम खेळण्याच्या बहाण्याने बालिकेशी अश्‍चिल चाळे करून जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार पिडीत बालिकेने घरी सांगितल्यानंतर बालिकेच्या आईने याबाबत सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून मंगेश शिंदे याच्यावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार पाटील करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!