सेन्सेक्सने घेतली ३९० अंकांची घसरण


 

स्थैर्य, मुंबई, २० : निफ्टीने ०.८४% किंवा ९६.२० अंकांची घसरण घेत ११,४०० च्या पातळीखाली ११,३१२.२० अंकांवर विश्रांती घेतली. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सनेदेखील १.०२% किंवा ३९४.४० अंकांची घसरण घेत ३८,२२०.३९ अंकांवर थांबला.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात टाटा मोटर्स (२.६४%), एचडीएफसी (२.२८%), अॅक्सिस बँक (२.१६%), आयसीआयसीआय बँक (२.०३%) आणि विप्रो (१.८८%) हे निफ्टीकील टॉप लूझर्स ठरले तर एनटीपीसी (६.८७%), ओएनजीसी (३.३३%), पॉवर ग्रिड (२.५९%). कोल इंडिया (२.३७%) आणि बीपीसीएल (२.०१%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅपने अनुक्रमे ०.८७% आणि ०.७२% ची वृद्धी घेतली. आजच्या यादीत निफ्टी बँकेने खराब कामगिरी केली. तर ऊ्जा क्षेत्राने आजच्या सत्रात तीव्र नफा कमावला.

जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लि. : वित्तीय वर्ष २०२१ मधील पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा २०.८ कोटी रुपये झाला. तर कंपनीचा महसूल ५७.३% नी घसरला. तरीही कंपनीचे शेअर्स १.७६% नी वाढले व त्यांनी ११२.७० अंकांवर व्यापार केला.

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड : कंपनीच्या शेअर्समध्ये २.०३% ची वृद्धी झाली आणि त्यांनी ४९०.५० रुपयांवर व्यापार केला. २०२१ च्या उत्तरार्धात कंपनीने औषध शोध सहाय्यक कंपनी इचनोस सायन्सेसमधील स्टेक विकल्यानंतर हे परिणाम दिसून आले.

टाटा पॉवर कंपनी लिमिटेड : कंपनीने नुकतेच सध्याच्या व्यवसायाची रचना तसेच देशातील पहिल्या 2 कंपन्यांपैकी एक बनण्यासाठीच्या योजनेचे प्रदर्शन केले. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ८.०२% ची वाढ झाली व त्यांनी ६१.२५ रुपयांवर व्यापार केला.

मुथुट फायनान्स लिमिटेड : २०२१ या वित्त वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीने आपले स्कोअरकार्ड जाहीर केले. त्यानंतर कंपनीचे शएअर्स ५.४७% नी घसरले व त्यांनी १,१८७ रुपयांवर व्यापार केला.

आरबीएल बँक लि. : कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांच्या समुहाला प्राधान्य देत शेअर्सच्या माध्यमातून १,५६६ कोटी रुपयांचा निधी जमा करण्यास परवानगी दिली. त्यानंतर आरबीएल बँकेचे शेअर्स १.५४% नी खाली आले व त्यांनी १८१.९५ रुपयांवर व्यापार केला.

भारतीय रुपया : देशांतर्गत इक्विटी मार्केटमधील विक्री आणि जागतिक पातळीवरील कामगिरीमुळे अमेरिकी रुपयाच्या तुलनेत भारतीय रुपयाने आज घसरण अनुभवली व तो ७४.९८ रुपयांवर स्थिरावला.

जागतिक बाजार : अमेरिका आणि चीनमधील वाढता तणाव आणि अर्थव्यवस्थेवरील कोरोनाच्या परिणामामुळे वाढलेली चिंता, यामुळे आशियाई आणि युरोपियन बाजारात घसरणीचा व्यापार झाला. नॅसडॅक ०.५७%, एफटीएसई १०० ने १.००%, एफटीएसई एमआयबीमध्ये ०.९१%, निक्केई २२५ ने १.००% नी घसरण घेतली तर हँगसेंगमध्येही १.५४% ची घट दिसून आली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!