
सातारा – प्रवचनकार गुरुनाथ महाराज कोटणीस यांचा सत्कार करताना मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी. (छायाचित्र – अतुल देशपांडे, सातारा)
स्थैर्य, सातारा, दि. 8 ऑक्टोबर : येथील राजवाडा परिसरातील पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सहस्त्रचंडी महायज्ञ व विविध धार्मिक कार्यक्रम तसेच समाजसेवी उपक्रमां मध्ये सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील अनेक मान्यवर देवी भक्तांचे सहकार्य लाभत आहे. केवळ सामान्य नागरिकांबरोबरच नव्हे तर अनेक लोकप्रतिनिधी तसेच मान्यवर जे विविध क्षेत्रात आज उच्चपदस्थ आहेत अशा सर्वांचाही हातभार या सहस्त्र महायाग सोहळ्यात थेट किंवा अप्रत्यक्षरीत्या मिळत असल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख व विश्वस्त विनायक शास्त्री चिखलगे यांनी प्रतिनिधीला दिली.
दरम्यान सोहळ्यास शिवसेना नेते,रोजगार हमी-फलोत्पादन कॅबिनेटमंत्री ना. भरतशेठ गोगावले यांनी मनोभावे दर्शन घेऊन ट्रस्ट च्या पुढील कार्याची माहिती घेतली. यावेळी त्यांचे समवेत शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे, उपजिल्हा प्रमुख विकास अण्णा शिंदे, शहर संघटक किरण कांबळे, विभाग प्रमुख सिद्धेश जाधव, शाखा प्रमुख तेजस जाधव, शुभम साळुंखे, प्रसाद चौधरी व मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
यावेळी समर्थ भक्त गुरुनाथ महाराज कोटणीस यांचा विशेष सत्कार मंदिर ट्रस्टचे वतीने मंदिराचे पदाधिकारी व विश्वस्तांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी समर्थ सेवा मंडळाचे सहकारी गजाननराव बोबडे, संतोष वाघ, राजू कुलकर्णी, रांगोळी कार महेश जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. मंदिर ट्रस्ट लवकरच राजा शिवछत्रपतींचे वंशज अर्थात छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या संपूर्ण चरित्राचा एक अनोखा असा आगळावेगळा प्रदर्शनी उपक्रम साकारण्यासाठी संकल्प केला आहे. ट्रस्टला पेढ्याचा भैरोबा येथे मिळालेल्या दानस्वरूपातील लवकरच भव्य गोशाळा ही उभारणार आहे अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे.
या महायज्ञ सोहळ्यासाठी वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले,ओंकार शास्त्री बोडस, दिलीपशास्त्री आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली 65 हून अधिक ब्रह्मवृंद सहभागी झाले आहे. सहस्त्रचंडी महायज्ञ सोहळ्यात धार्मिक कार्यक्रमांतर्गत सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत सप्तशती पाठ वाचन व चंडी याग संपन्न होऊन सायंकाळी पाच ते सात या वेळेत देवी अर्चना होणार आहे हा धार्मिक कार्यक्रम अशा पद्धतीने नऊ ऑक्टोबर गुरुवारपर्यंत होणार असून 10 ऑक्टोबर शुक्रवारी सकाळी साडेसात ते बारा या वेळेत क्षेत्रपाल पूजन, उत्तरांग तसेच या महायज्ञाची पूर्णाहूती, कुष्मांड बली सर्वांना आशीर्वाद व हातात प्रसादाचे वितरण होणार आहे. या महायज्ञ कालावधीमध्ये सकाळी सहा वाजता काकड आरती व सायंकाळी सात वाजता महाआरती संपन्न होणार आहे. सहस्त्रचंडी महायज्ञनिमित्त धार्मिक कार्यक्रमांंबरोबरच नजीकच्या समर्थ सदन सांस्कृतिक केंद्र येथे सायंकाळी सहा ते आठ या वेळेत विविध कीर्तन, प्रवचन ,सत्कार संपन्न होणार आहेत ,यामध्ये बुधवार दि.8 ऑक्टोबर , गुरुवार दि. 9 ऑक्टोबर दरम्यान सायंकाळी सहा ते आठ या वेळेत पुणे येथील सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार समर्थ भक्त चारुदत्त बुवा आफळे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे .
शुक्रवार दि. 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य नागरी सत्कार व समारोपाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. रविवार दि. 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आहे. मंगळवार दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत कर्करोग तपासणी मोफत शिबिर तसेच विविध आजारांबाबत आरोग्य महा शिबिर आयोजित आयोजन करण्यात आले आहे .बुधवार दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या सहस्त्रचंडी महायज्ञ यांच्या धार्मिक सोहळ्यासाठी राज्याच्या प्रमुख नेते, जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्री. छ .उदयनराजे भोसले, बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सह विविध मान्यवरांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आहे. या यज्ञाच्या आयोजनासाठी दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख ,उपाध्यक्ष राजेंद्र साळुंखे ,सचिव शिवाजी उर्फ प्रशांत तुपे ,उपाध्यक्ष शिवाजी भोसले कोषाध्यक्ष प्रेमचंद पालकर यांचेसह हरीष शेठ, विनायक चिखलगे तसेच सर्व विश्वस्त व कार्यकारणी सदस्य हितचिंतक विशेष परिश्रम घेत आहेत.
सहस्त्रचंडी महायज्ञ साठी भक्तांकरीता 80 जी कलमानुसार देणगीदारांना इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर खात्यातून सवलत मिळणार आहे तसेच या महायज्ञा साठी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह मंडळचे अध्यक्ष सुभाषराव बागल, माजी नगराध्यक्ष अशोकराव मोने, समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर,सातारा शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे, महेश राजेमहाडिक, चंद्रशेखर ढाणे, प्रकाश बडदरे तसेच सर्व साधक, सनातनी संस्था सातारा यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

