भाजप सोशल मीडिया आयटी सेलच्या सातारा जिल्हा सहसंयोजकपदी सुधीर जगदाळे यांची निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३१ जानेवारी २०२४ | फलटण |
भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया आयटी सेलच्या सातारा जिल्हा सहसंयोजकपदी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू सहकारी कोळकी, ता. फलटण येथील सुधीर जगदाळे यांची निवड करण्यात आलेली आहे. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सोशल मीडिया प्रदेश संयोजक प्रकाशजी गाडे, प्रदेश संयोजक तेजस मालवीय, भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांच्या सूचनेनुसार जिल्हा संयोजक श्री. संजय घार्गे (सर) यांनी सोशल मीडिया आयटी सेलच्या फलटण विभागाच्या काही नियुत्या जाहीर केल्या. त्यामध्ये सुधीर जगदाळे यांची सातारा जिल्हा सहसंयोजक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तसेच फलटण मंडल संयोजकपदी संदीप जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.

सध्याच्या राजकारणात सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे, तसेच आयटी सेलचे काम NamoApp, Saral App, MygovIndia इ.च्या माध्यमातून पक्षाचे काम, जनकल्याणकारी योजना, पक्षाची ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोहोचविणे, भाजपाचे वेबपोर्टल सांभाळणे, तांत्रिक बाबी सोडवणे व भाजपाच्या लाईव्ह कार्यक्रमांचे होस्टिंग व प्रक्षेपण करणे हे आहे.

पक्षाचा कार्यकर्ता जसा ऑनग्राउंड बूथवर घरोघरी जाऊन काम करतो, तसेच मोदी सरकार, राज्यातील महायुती सरकार करत असलेली कामे जनतेपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवण्याचे काम नवनियुक्त दायित्व मिळालेले कार्यकर्ते करतील, असा विश्वास सोशल मीडिया आय. टी. जिल्हा संयोजक संजय घार्गे (सर) यांनी व्यक्त केला.

यावेळी मंचावर फलटण तालुक्यातील ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य जयकुमार शिंदे, भाजपा सोशल मीडिया आयटी सेलचे जिल्हा संयोजक संजय घार्गे, भाजपचे नेते राजकुमार नाना पाटील, महादेव पोकळे, प्रकाश नांदले, राजेंद्र मदने, ऋषिकेश नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!