धुळदेव येथे कृषिकन्यांनी सादर केले बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३१ जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२०२४ कार्यक्रमाअंतर्गत बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक सादर केले.

कृषीकन्या सिद्धी शेटे, साक्षी जाधव, समृद्धी जगताप, सिद्धिका कांबळे, स्वेजल पाटील, प्रियांका शिंदे, प्रियांका भोसले व श्वेता सस्ते यांनी रासायनिक पद्धतीने बीज प्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक शेतकर्‍यांसमोर करून दाखवले. त्याअंतर्गत त्यांनी शेतकर्‍यांना बीज प्रक्रियेसाठी लागणारे साहित्य जसे की, बुरशीनाशक, गुळाचे पाणी, इत्यादींची ओळख करून दिली.त्यांनी बीजप्रक्रियेसाठी वापरले जाणारे रसायन (बाविस्टीन) व त्यातील रासायनिक घटक याची माहिती शेतकर्‍यांना दिली. तसेच त्यांनी बीज प्रक्रियेसाठी लागणारे द्रावण तयार करण्याची पद्धत सविस्तररित्या शेतकर्‍यांसमोर मांडली.

कृषिकन्यांनी या बीजप्रक्रियेचे होणारे फायदे जसे की, बियांच्या उगवण क्षमतेमध्ये होणारी वाढ, बुरशीजन्य रोगजंतूपासून बियाण्यांचा बचाव, पिकांची जोमदार वाढ इत्यादी शेतकर्‍यांना पटवून दिले. या उपक्रमास शेतकर्‍यांनी उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वय प्रा. नीलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित, प्रा. प्रविण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.


Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!