
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि. 13 : गेले कित्येक दिवसापासून संपूर्ण जगभरात covid-19 या आजाराने धुमाकूळ घातला आहे पण लॉक डाऊन हे त्याला सोल्युशन नाही आता भारतात हळू हळू लॉकडाऊन उघडत चाललेले आहे. आता लॉक डाउन नंतर लोकांची गर्दी ही वाढणार या सगळ्या या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या शाहूनगर वासियांना व आपल्या सातारा ला कुठलाही त्रास होऊ नये व सातारा जिल्हा लवकरात लवकर करोना मुक्त व्हावा यासाठी सवय भान या सातारा रक्षक ग्रुपची ची स्थापना झाली. नक्कीच यातून साताऱ्याला सगळ्या सवयींचा भान राहील व सर्व सातारा सुरक्षित राहील याची आम्ही सर्व मेम्बर्स नक्की काळजी घेऊ व सातारा सुरक्षित करण्यामध्ये मध्ये मला माझे योगदान देण्याची संधी मिळाली त्याबद्दल सर्व सातारकरांचे मी आभारी आहे.
