
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा

स्थैर्य, मुंबई, दि. 13 : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांना फोन करून प्रकृतीबाबत विचारपूस केली.
“स्वतःची काळजी घे, कुटुंबाची काळजी घे. आई आणि मुली लहान आहेत. कोरोनामधून लवकर बरा हो,” असं पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात पहिल्यांदाच संभाषण झाल्याचं बातमीत म्हटलं आहे.




