“ओळख स्वातंत्र्यसैनिकांची” ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सातारला कार्यक्रम


दैनिक स्थैर्य । दि. ०७ ऑगस्ट २०२२ । सातारा । भारतीय स्वातंत्र्याच्या पंचाहत्तराव्या  वर्षानिमित्त तसेच ऑगस्ट क्रांती दिनाच्या म्हणजेच ९ ऑगस्ट १९४२ च्या चले जाव च्या घोषणेस ८० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघ सातारा यांच्यावतीने एक अभिनव असा  ” *ओळख स्वातंत्र्य सैनिकांची* ” हा कार्यक्रम बुधवार दि १० ऑगस्ट रोजी सातारा येथे  जेष्ठ नागरिक संघाच्या सभासदांसाठी आयोजित केला आहे अशी माहिती ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष श्रीमती वैदेही देव व कार्यवाह विजय मांडके यांनी दिली.                                        –
ज्येष्ठ नागरिक संघ सातारच्या सभासदांनी स्वातंत्र्य चळवळीतील त्यांना भावलेल्या स्वातंत्र्यसैनिकाची माहिती ठराविक वेळेत उपस्थितांना द्यायची आहे. त्यामध्ये क्रांतिकारक ,स्वातंत्र्यसैनिक असावेत. ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्व सभासदांना यात भाग घेता येईल अशी माहिती खजिनदार मदन देवी यांनी दिली.                                      –
ज्येष्ठ नागरिक संघाच्या श्री. छ.  प्रतापसिंह महाराज (थोरले) उद्यानातील सभागृहात बुधवार दि १० रोजी सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे तरी या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन उपाध्यक्ष भिकाजीराव सूर्यवंशी व श्रीमती ज्योती मोहिते यांनी केले आहे.

Back to top button
Don`t copy text!