केरळच्या शिवभक्त युवकाचे शिवतीर्थ येथे सातारकरांनी कंदी पेढ्याचा हार देऊन केले स्वागत


दैनिक स्थैर्य । दि. २४ जानेवारी २०२३ । सातारा । गेली आठ महिने सायकलवरुन महाराष्ट्रातील गडकिल्ले भटकंती करणारा केरळचा युवक हमरास एम.के. यांचे साताऱयात शिवतीर्थ येथे रविवारी दुपारी स्वागत करण्यात आले. सातारकरांच्यावतीने त्यांचे कंदी पेढय़ाचा हार देवून व सायकल भेट देवून सातारी पद्धतीने अनोखा पाहुणचार करण्यात आला. हमरास हा सातारकरांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल भावूक झाला. पुढे तो सज्जनगडाच्या दिशेने त्याने मार्गक्रमण केले. माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी हमरास याच्या स्वागतासाठी पुढाकार घेतला होता.

केरळ येथील युवक हमरास हा गेली आठ महिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरीत होवून सायकलवरुन गडकोटांना भेट देत आहे. त्याने महाराष्ट्रातील 117 किल्यांना भेट दिली असून 118 किल्ला सज्जनगडाला भेट देण्यापूर्वी त्याने दुपारी साताऱयात शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास अभिवादन हमरास याने केले. त्यावेळी तेथे त्याचे स्वागत साताकरांच्यावतीने माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, साताऱयाचे उद्योजक योगेश मोदी, माजी नगरसेवक धनंजय जांभळे, सुजित आंबेकर परीषशेठ ठकर.तैफिक बागवान.किरन राजे भोसले यांच्यासह सातारकरांनी त्याचे कंदी पेढे देवून स्वागत केले. त्याची छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती असलेली भक्ती पाहून त्याचे कौतुक केले. यावेळी बोलताना माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य वाचून ऐकून केरळचा युवक मराठय़ांच्या राजधानी येतो आहे. किल्ले अजिंक्यताऱयाला भेट देतो. शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन करतो आहे. ही बाब आम्हा सातारकरांसाठी अभिमानाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेवून एका ध्येयाने प्रेरीत होवून कार्य करणाऱया हमरासला साताकर म्हणून आम्ही मदत करणार अशी त्यांनी ग्वाही दिली.

सायकल दिली भेट
सायकलवरुन गडकोटांची भटकंती करणाऱया हमरासची सायकल पाहून साताकरांनी साताऱयाच्यावतीने सायकल भेट देण्याची इच्छा शिवतीर्थावर व्यक्त केली. माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी केलेल्या आवाहनानुसार लगेच सातारकरांनी मदत केली. त्यांनी सायंकाळी त्यास सायकल भेट दिली. हमरास ही सातारकरांनी दिलेले प्रेम पाहून भावूक झाला.


Back to top button
Don`t copy text!